घरताज्या घडामोडीCoronavirus : एअर इंडियाची आर्थिक मदतीची मागणी

Coronavirus : एअर इंडियाची आर्थिक मदतीची मागणी

Subscribe

एकीकडे कॅबिनेटने एअर इंडियाच्या कामाचे उघडपणे कौतुक केले आहे परंतु दुसरीकडे शासनाने कोणताही निधी एअर इंडियासाठी वापरला नाही, असे या पत्रात म्हटले आहे.

करोना विषाणूच्या महामारी दरम्यान एअर इंडियाच्या दोन वैमानिक संघटनांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. इंडिया कमर्शियल पायलट्स असोसिएशन आणि इंडियन पायलट्स संघटनेने नागरी विमान मंत्री हरदीपसिंग पुरी यांना एक पत्र लिहून निर्गुंतवणूकीच्या राष्ट्रीय वाहकासाठी तातडीची आर्थिक मदत मागितली आहे.

- Advertisement -

एअर इंडियाचे कर्मचारी देशातील लोकांना जगातील कोरोनाग्रस्त देशातून परत आणण्यासाठी पुढे आले आहेत. संसर्गाची दाट शक्यता असतानाही आमचे वैमानिक आपले कर्तव्य बजावत आहेत. याकरता आम्हाला तातडीची आर्थिक मदत पुरवा जेणेकरून आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने आमचे कर्तव्य पार पाडू, असे या पत्रात म्हटले आहे. एकीकडे कॅबिनेटने एअर इंडियाच्या कामाचे उघडपणे कौतुक केले आहे परंतु दुसरीकडे शासनाने कोणताही निधी वापरला नाही, असे या पत्रात म्हटले आहे. आधीच एअर इंडियाचे नुकसान झाले आहे. त्यात आता करोनामुळे उड्डाणे रद्द झाली आहेत. टूर्स रद्द झाल्या आहेत. त्यामुळे अजून नुकसान होत आहे.


हेही वाचा – करोनाच्या भीतीने रक्तदान करण्यास घाबरू नये

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे. तसेच परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याचे काम केंद्र सरकार करत आहेत. यात विमान कंपन्या परदेशात आपले विमान पाठवून अडकलेल्या भारतीय नागरिकांची मदत करत आहेत.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -