घरमुंबईशिवसेनेने भाजपची मैत्री जपली; अवघ्या १५ दिवसांमध्ये शिरसाट यांची एन्ट्री!

शिवसेनेने भाजपची मैत्री जपली; अवघ्या १५ दिवसांमध्ये शिरसाट यांची एन्ट्री!

Subscribe

मुंबई महापालिकेतील भाजपचे नामनिर्देशित सदस्य असलेल्या गणेश खणकर यांचा राजीनामा घेतल्यानंतर त्या रिक्त जागेवर भाजपचे महापालिकेचे प्रभारी भालचंद्र शिरसाट यांची नेमणूक करण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी खणकर यांचा राजीनामा मंजूर करत त्या रिक्त जागेवर शिरसाट यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे अखेर शिरसाट मागील दाराने महापालिका सभागृहात येऊन बसले आहेत. मात्र, भाजपच्या नामनिर्देशित सदस्यांची घोषणा पुढील तीन महिने लांबणीवर टाकण्याचा सत्ताधारी पक्षाचा विचार होता. एकप्रकारे भाजपला शह देण्याचा प्रयत्न सुरु असतानाच सत्ताधारी पक्षाने, विरोधी पक्षाला न जुमानता आपली जुनी मैत्री जपत भाजपच्या शिरसाट यांना महापालिकेत प्रवेश दिला आहे.

तातडीचे कामकाज म्हणून पटलावर घेतला विषय

मुंबई महापालिकेच्या भाजपच्या गटनेतेपदी प्रभाकर शिंदे यांची निवड करतानाच त्यांना विरोधी पक्षनेतेपदापासून वंचित ठेवणार्‍या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या नामनिर्देशित सदस्यांची निवड लांबणीवर टाकून त्यांना झटका देण्याचा प्रयत्न करतील, असे बोलले जात होते. खणकर यांचा राजीनामा तातडीचे कामकाज म्हणून घेण्यात आले होते. त्यामुळे विषय क्रमांक ३७० हा क्रमांक पाहता पुढील तीन महिन्यांमध्ये हा प्रस्ताव पटलावर येणार नाही, असेच चित्र होते. परंतु शिरसाट यांनी आपल्या निवडीची सर्व कायदेशीर प्रक्रिया करून याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांच्या माध्यमातून तातडीचे कामकाज म्हणून पटलावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे हा प्रस्ताव मंगळवारी १७ मार्च रोजी महापौरांनी पटलावर घेत याला मंजुरी दिली. त्यामुळे खणकर यांच्या राजीनामा मंजूर करत त्या रिक्त जागी भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

या घटनेमुळे आज जरी शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आली असली तरी, जुन्या मैत्रीचा ओलावा अजूनही ह्रदयात असल्यामुळे या मैत्रीला जागून सत्ताधारी शिवसेनेने आणि पर्यायाने महापौरांनी शिरसाट यांना महापालिका सभागृहात अधिकृत प्रवेश दिल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

स्थायी समितीत येण्याचा मार्ग मोकळा

नामनिर्देशित सदस्य म्हणून भालचंद्र शिरसाट यांची निवड झाल्यामुळे आता त्यांची वर्णी स्थायी समितीवर लावली जाणार आहे. महत्वाच्या समित्यांमध्येही ते सदस्य म्हणून राहणार आहेत. नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार नसला तरी शिरसाट यांची नियुक्ती मात्र होणार आहे.


वाचा सविस्तर – गटनेत्याऐवजी भाजपने विरोधी पक्षनेत्याचे नाव सारले पुढे!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -