घरताज्या घडामोडीनोकरदारांनो सावधान, मंदीचे वारे वाहू लागलेत

नोकरदारांनो सावधान, मंदीचे वारे वाहू लागलेत

Subscribe

नववर्षात भारतातही मंदीची लाट धडकणार असल्याचा इशारा तज्त्रांनी दिला आहे.

दोन वर्ष कोरोना महामारी, लॉकडाऊनचा सामना केल्यानंतर जगातील सगळ्याच देशांची आर्थिक व्यवस्था रुळावर येत असतानाच पुन्हा एकदा मंदीचे वारे वाहू लागलेत. नेटफ्लिक्स, टि्वटरने कर्मचारी कपात केल्यानंतर मेटा, सिस्को,अमेझॉनसह अनेक बड्या आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून तडकाफडकी काढले . यामुळे नोकरदार वर्गात चिंतेचे वातावरण असून नववर्षात भारतातही मंदीची लाट धडकणार असल्याचा इशारा तज्त्रांनी दिला आहे. याचपार्श्वभूमीवर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनीही मंदी येत असल्याने घर आणि गाड्या यांसारख्या महागड्या गोष्टींची खरेदी करू नका असा सल्ला दिला आहे.

मंदी म्हणजे नेमके काय? केव्हा येते मंदीची लाट
मंदी म्हणजे मंद पडणे. आर्थिक क्षेत्रात हा शब्द सरार्सपणे वापरला जातो. प्रामुख्याने जेव्हा देशाची अर्थव्यवस्था कोलमडते, जीडीपीत घसरण सुरू होते आणि हाच आलेख तिमाहीपर्यंत राहतो तेव्हा देशात आर्थिक मंदी आल्याचे बोलले जाते. आर्थिक मंदी ही यु्द्ध, गृह युद्ध, महामारीसारख्या परिस्थितीमुळे येते. कोरोना महामारीत हा अनुभव सगळ्या जगानेच घेतला आहे. कोरोना नियंत्रणात येताच युक्रेन रशिया यु्द्ध सुरु झाले . तर अरब देशांमध्ये आपसातच गृहयु्द्ध सुरू झाले. परिणामी या सगळ्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारांवरही झाला असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम झाले आहेत . नेटफ्लिक्स, टि्वटर मेटा, सिस्को,अमेझॉनसह अनेक लहान मोठ्या आयटी कंपन्यांनी सुरु केलेली कर्मचारी कपात हे याचेच ताजे उदाहरण आहे.

- Advertisement -

मंदी आल्यानंतर एकीकडे नोकऱ्या जातात तर दुसरीकडे महागाईचा दर अचानक वाढू लागतो. तसेच दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंच्या किंमतीतही वाढ होते. यामुळे सामान्यांचे बजेटही पुरते कोसळते. तसेच मंदीच्या काळात रियल इस्टेटसह इतर खरेदी विक्रीचे व्यवहारही मंदावतात. तर याच काळात घरांबरोबरच दुकानांची विक्री मंदावल्याने कमी किंमतीत घरांची विक्री केली जाते.

दरम्यान, मंदी येणार हे भाकित प्रामुख्याने अमेरिकेची नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक्स रिसर्च ही संस्था करते. या संस्थेत आठ अर्थतज्त्र असून देशातील आर्थिक उलाढालींवर ते सातत्याने नजर ठेऊन असतात. ज्यावेळी एखाद्या देशाची अर्थव्यवस्था डळमळते तेव्हा तिचा परिणाम इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची दाट शक्यता असते. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापारावर याचा विशेष परिणाम होतो. याचपार्श्वभूमीवर भारतातही मंदीचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे आहे तो पैसा जपून खर्च करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -