पुण्यातील सेक्सटॉर्शनचे धागेदोरे राजस्थानमध्ये, गावातील २५०० जणांचं रॅकेट उघडकीस

अन्वर खान याची कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरुगोठडी गावातील जवळपास २५०० लोक सेक्सटॉर्शन रॉकेट सहभागी असल्याचं समोर आलं आहे.

pune sextortion case rajasthan

पुणे – सेक्सटॉर्शनला (Sextortion) बळी पडल्याने पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली होती. आता या प्रकरणातील धागेदोरे सापडले असून पुणे पोलिसांनी थेट राजस्थानमधील गुरुगोठडी (Gurugothadi) हे गाव गाठलं आहे. या गावातील तब्बल २५०० लोकांचा सेक्शटॉर्शनमध्ये समावेश असून पोलीस या रॅकेटचा (Sextortion Racket in Rajasthan) ) कसून तपास करत आहेत.

हेही वाचा सोशल मीडियावरचे चोर, जीवाला लावतात घोर!

पुण्यातील सेक्सटॉर्शन प्रकरणी तपास सुरू असताना पुणे पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली. पुण्यातील तरुणांना ज्या मोबाईल नंबरवरून धमाकावलं जात होतं, त्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करून पोलिसांनी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड गुरुगोठडी गावाचं लोकेशन सापडलं. या लोकेशनवर पोलिसांनी आरोपी अन्वर खान याला अटक करण्याचा प्रयत्न केला. परंतु गावातील लोकांनी पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. हा हल्ला उलटवत पोलिसांनी आरोपीला अटक केलीच.

अन्वर खान याची कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरुगोठडी गावातील जवळपास २५०० लोक सेक्सटॉर्शन रॉकेट सहभागी असल्याचं समोर आलं आहे.

सेक्सटॉर्शन म्हणजे काय?

सोशल मीडियाच्या माध्यमातून सेक्सटॉर्शन केलं जातं. बनावट खातं तयार करून तरुणांना हेरलं जातं. मुलीच्या नावाने बनावट खातं खोललं जातं. या माध्यमातून तरुणांशी सोशल माध्यमातून सलगी केली जाते. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ शेअर करायला सांगितले जातात. तरुणांनी असे फोटो वा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यांचे हे फोटो-व्हिडीओ मॉर्फ केले जातात. त्यामाध्यमातून धमकावलं जातं. त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. खंडणी मागितली जाते. पुण्यातील प्रकरणात असाच प्रकार घडला. पुण्यातील शंतनु वाडकर आणि अमोल गायकवाड या तरुणांकडून खंडणी मागितली. मात्र, या तरुणांना त्रास सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली.