घरताज्या घडामोडीअंबानींना मागे टाकत Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

अंबानींना मागे टाकत Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Subscribe

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आता आशियाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यामुळे अदानींनी आता रिलायंस इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांना मागे टाकत बाजी मारली आहे. मात्र या अदानींना नंबर-1 पोजिशनपर्यंत पोहोचण्यासाठी 2021 या वर्षाचा खूप मोठा हात आहे.

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आता आशियाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यामुळे अदानींनी आता रिलायंस इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांना मागे टाकत बाजी मारली आहे. मात्र या अदानींना नंबर-1 पोजिशनपर्यंत पोहोचण्यासाठी 2021 या वर्षाचा खूप मोठा हात आहे. जाणून घ्या किती मोठा आहे अदानींचा कारभार.2021 मध्ये गौतम अदानी यांचं नशिब पालटलं कारण कंपनीच्या शेअर मूल्यात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे त्यांचे नेटवर्कही मोठ्या प्रमाणात वाढले. जानेवारी 2021 मध्ये ,गौतम अदानी यांची एकूण संपत्ती फक्त $34.9 अब्ज इतकी होती. या किमतीने डिसेंबर 2021 मध्ये अखेर $76 अब्ज पार केले. त्यामुळे अदानी यांची संपत्ती एका वर्षात दुप्पट झाली.

फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, 4 फेब्रुवारी 2022 रोजी अदानी आणि त्यांच्या कुटूंबाची संपत्ती $ 90.0 अब्ज पार केली आहेत. हे मुकेश अंबानी यांच्या 89 डॉलर्सच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे.गौतम अदानी हे रिलायन्स इंडस्ट्रीचे संस्थापक आणि मुकेश अंबानींचे वडील धीरुबाई अंबानी यांच्यासारखे पहिल्या पिढीतील उद्योगपती आहेत. महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण न करु शकलेल्या अदानींनी फक्त 5 लाख रुपयांपासून पहिली कंपनी सुरु केली.

- Advertisement -

अदानी वयाच्या 16 व्या वर्षी व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आले.

वयाच्या 16 व्या वर्षी व्यवसाय करण्यासाठी ते मुंबईत आले. 1978 मध्ये त्यांनी हिऱ्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली. 1981 मध्ये गुजरातला जाऊन भावाच्या प्लास्टीक कारखान्यात काम सुरु केले. 1988 मध्ये त्यांनी 5 लाख रुपयांच्या गुंतवणूकीतून कमोडीटी एक्सपोर्ट-इम्पोर्ट कंपनी म्हणून अदानी एक्सपोर्टस सुरु केली. या कंपनीचे नामांतरण करुन अदीनी एंटरप्रायजेस असे केले.


हे ही वाचा – Kiran Mane: किरण मानेंची पॅनोरमा प्रॉडक्शन हाऊस विरोधात कायदेशीर कारवाईची याचिका, ५ कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -