घरक्राइमअमेरिकेत 20 वर्षीय भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची हत्या, कोरियन रुममेटला अटक

अमेरिकेत 20 वर्षीय भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची हत्या, कोरियन रुममेटला अटक

Subscribe

20 वर्षीय भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमेरिकेच्या इंडियानामध्ये घडली. इंडियानामधील पर्ड्यू विद्यापीठात शिकणाऱ्या वरुण मनीष छेडा या 20 वर्षीय भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात हत्या करण्यात आली.

20 वर्षीय भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमेरिकेच्या इंडियानामध्ये घडली. इंडियानामधील पर्ड्यू विद्यापीठात शिकणाऱ्या वरुण मनीष छेडा या 20 वर्षीय भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात हत्या करण्यात आली. याप्रकरणी त्याच्या कोरियन रूममेटला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, त्याच्या हत्येमागची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. (america indian origin university student killed in us korean roommate arrested)

वरुण छेडाच्या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी अधिक तपास केला असता वरूणचा मृतदेह कंपाऊंडच्या पश्चिमेकडील मॅककचॉन हॉलमध्ये मृतावस्थेत आढळल्याचे पोलीस तपासात समोर आले. विद्यापीठातील आणखी एका विद्यार्थ्याला बुधवारी हत्येप्रकरणी अटक करण्यात आली.

- Advertisement -

पर्ड्यू युनिव्हर्सिटीचे पोलिस प्रमुख लेस्ली व्हिएटे यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. कोरियाचे कनिष्ठ सायबर सुरक्षा प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी जी मिन जिमी शा यांनी बुधवारी रात्री 12:45 च्या सुमारास पोलिसांना मृत्यूची माहिती देण्यासाठी 911 वर कॉल केला. मात्र, कॉलचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मॅककचॉन हॉलच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत ही घटना घडली. बुधवारी त्याच्या किंकाळ्या अनेकांनी ऐकल्या होत्या.

वरुणच्या मृत्यूबद्दल विद्यापीठातील अनेक विद्यार्थी एकत्र आले होते. छेडा यांचे बालपणीचे मित्र अरुणाभ सिन्हा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, वरूण मंगळवारी रात्री ऑनलाइन गेम खेळत होता आणि मित्रांसोबत बोलत होता.

- Advertisement -

दरम्यान, वरूण हा विद्यापीठात डेटा सायन्सचे शिक्षण घेत होते. प्राथमिक पोस्टमार्टम अहवालानुसार छेडा यांचा मृत्यू अनेक तीक्ष्ण जखमांमुळे झाल्याचे समोर आले असून, मृत्यूचे कारण हत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा – एनसीबीकडून 120 कोटींचे 50 किलो ड्रग्ज जप्त; एअर इंडियाच्या माजी पायलटसह दोघांना अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -