घरदेश-विदेशभीषण गोळीबाराने अमेरिका पुन्हा हादरली; तीन विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू

भीषण गोळीबाराने अमेरिका पुन्हा हादरली; तीन विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू

Subscribe

अमेरिकेतील एका खासगी शाळेमध्ये गोळीबार झाला असून, यामध्ये तीन विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेतील गन कल्चरमुळे तेथे अनेकदा भीषण गोळीबार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. परवाना घेऊन बंदूक बाळगणा-यांच्याबाबत आता अमेरिकेला पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. कारण मागच्या काही वर्षांत अशा लोकांकडून बेछूट गोळीबारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. अमेरिकेतील एका खासगी शाळेमध्ये गोळीबार झाला असून, यामध्ये तीन विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर एक महिला होती आणि तिला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळावरील जखमींना रुग्णालयातदाखल करण्यात आले पण, तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण त्याआधीच गोळीबारात अनेक जण जखमी झाले होते.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी मनरो कॅरेल ज्युनियर चिल्ड्रन हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र,डाॅक्टरांनी जखमींना मृत घोषित केले. या गोळीबारात तीन विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

महिला हल्लेखोर दरवाजातून इमारतीत घुसली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला हल्लेखोर शाळेच्या दरवाजातून इमारतीत घुसली होती आणि ती पळून जात असताना, चर्चच्या दुस-या मजल्यावर पोलिसांशी सामना झाला आणि त्यांच्यात चकमक झाली. या चकमकीत महिला हल्लेखोराला पोलिसांनी ठार केले. अमेरिकेत सोमवारी सकाळी एक महिला हल्लेखोराने टेनेसीच्या नॅशविल येथील शाळेवर हल्ला केला. हल्लेखोर महिला अंदाधूंद गोळीबार करत होती.

- Advertisement -

( हेही वाचा: सावरकरांच्या वक्तव्यावरून भाजपने राहुल गांधींना घेरलं, अनुराग ठाकूरपासून अनेक मंत्र्यांची जोरदार टीका )

विद्यार्थी आणि पालक भयभीत 

या घटनेनंतर शाळेत उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी पोलीस संरक्षणात सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गोळीबारामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह चर्चमध्ये आणण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, 2001 मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत अंदाजे 200 विद्यार्थी आणि 33 शिक्षक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -