घरदेश-विदेशअसंच सुरू राहिलं तर काॅंग्रेस नष्ट होईल; अमित शाहांची राहुल गांधींवर टीका

असंच सुरू राहिलं तर काॅंग्रेस नष्ट होईल; अमित शाहांची राहुल गांधींवर टीका

Subscribe

अमित शाह म्हणाले की, राहुल गांधी परदेशात जाऊन देशाबाबत वाईट बोलतात. हे असेच चालू राहिले तर एकदिवस संपूर्ण काँग्रेस देशातून नष्ट होईल, असं म्हणत शाह यांनी गांधींवर हल्लाबोल केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या चीननजीकच्या राज्यांमध्ये दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शाह मंगळवारी (11 एप्रिल) आसाममधील दिब्रुगड येथे भाजप कार्यालयाच्या पायाभरणी समारंभात सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना लक्ष्य केले आहे. अमित शाह म्हणाले की, राहुल गांधी परदेशात जाऊन देशाबाबत वाईट बोलतात. हे असेच चालू राहिले तर एकदिवस संपूर्ण काँग्रेस देशातून नष्ट होईल, असं म्हणत शाह यांनी गांधींवर हल्लाबोल केला आहे. Amit Shah said that Rahul Gandhi goes abroad and talks bad about the country If this continues one day the entire Congress will be destroyed

अमित शाह म्हणाले की, राहुल गांधींच्या आईनेही पंतप्रधान मोदींना शिव्या देण्याचा प्रयत्न केला, पण काहीही झाले नाही. आता 2024 ला तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहेत. काँग्रेसचे लोक पंतप्रधानांची कबर खोदतात. देशातील प्रत्येक रहिवासी पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. ते (विरोधक) पीएम मोदींबद्दल जितके वाईट बोलत राहतील, तितकं भाजप वाढेल, असं शाह यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

राहुल गांधींमुळे काॅंग्रेस अपयशी

शाह म्हणाले की, पीएम मोदी 14 तारखेला आसामला येत आहेत. ईशान्य हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण राहुल गांधींच्या दौऱ्यानंतरही अलीकडच्या निवडणुकीत ते अपयशी ठरले. आसाममध्ये दुसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) आसामच्या 70 टक्के भागातून काढून टाकण्यात आला आहे, इतर राज्यांशी असलेले सीमा विवाद सोडवले जात आहेत.

( हेही वाचा: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि संघावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले… )

- Advertisement -

आसाममध्ये 14 पैकी 12 जागा जिंकणार

केंद्रीय गृहमंत्री शाह पुढे म्हणाले की, भाजप हा संघटनेच्या जोरावर चालणारा पक्ष आहे आणि कार्यालय हे भाजपच्या सर्व कामांचे केंद्र आहे. सध्या ईशान्येतील 3 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या असून तिन्ही राज्यांमध्ये भाजप सरकारचा भाग आहे. ईशान्येतील 8 राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आहे आणि त्यामुळे ईशान्येचा विकास झाला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आसाममधील 14 पैकी 12 जागा जिंकेल आणि 300 हून अधिक जागांसह मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होतील, अशी भविष्यवाणी शाह यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -