घरदेश-विदेशआंध्र प्रदेश, तेलंगणात अपघात; चार जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश, तेलंगणात अपघात; चार जणांचा मृत्यू

Subscribe

तेलंगणा येथे रस्ते अपघतातही दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मोटारबाईक एका पोलवर धडकल्याने हा अपघात झाला. अनुषा व हरिकृष्णा या दोघांचा अपघातात मृत्यू झाला. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

अमरावतीः आंध्र प्रदेश व तेलंगणा येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
आंध्र प्रदेश येथील अपघात धुक्यामुळे झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सत्य साई जिल्ह्यात हा अपघात झाला. एका ट्रकने बैलगाडीला उडवले. या अपघतात बैलगाडीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधील जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे. मृत व्यक्तिंचे शव शवविच्छेदनासाठी पोलिसांनी पाठवले आहेत.

सकाळच्या वेळेत दाट धुके पसरले होते. रस्त्यावर काही स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे ट्रक चालकाला बैलगाडी दिसली नसावी. परिणामी हा अपघात झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
तसेच तेलंगणा येथे रस्ते अपघतातही दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मोटारबाईक एका पोलवर धडकल्याने हा अपघात झाला. अनुषा व हरिकृष्णा या दोघांचा अपघातात मृत्यू झाला. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात तर आमदारांच्या कारला अपघात झाला. शुक्रवारी आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात झाला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. त्याआधी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. परळी येथे हा अपघात झाला. त्यानंतर आमदार मुंडे यांना उपचारासाठी मुंबईत आणले. क्रिकेटपटू ऋषभ पंतही रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला आहे. खड्डा वाचवताना ऋषभच्या कारला अपघात झाला. त्यालाही उपचारासाठी मुंबईत आणले आहे. ऋषभवर शस्त्रक्रिया होणार आहे.

गेल्यावर्षी रस्ते अपघातात विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. तसेच उद्योगपती व टाटा सन्सचे प्रमुख सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला. पालघर येथे झालेल्या या अपघाताचे पोलिसांनी नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -