घरमहाराष्ट्रराज्य सरकार व्हेंटिलेटरवर, ते फेब्रुवारी महिना पाहणार नाहीत; संजय राऊतांचा दावा

राज्य सरकार व्हेंटिलेटरवर, ते फेब्रुवारी महिना पाहणार नाहीत; संजय राऊतांचा दावा

Subscribe

राज्यातील सरकार व्हेंटिलेटरवर आहे, त्यांच व्हेंटिलेटर सर्वोच्च न्यायालयाने काढलं तर हे राम बोले रे राम. मग कोणी त्यांच्यासोबत राहणार नाही. तसचं हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्यपालही लवकरचं जाणार असं विधानही राऊतांनी केलं आहे. संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

हे सरकार ४० आमदारांच्या पलीकडे नाही

राऊत म्हणाले की, एका अधिवेशात मुख्यमंत्र्यासह सहा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरणं देऊन सुद्धा सरकार अत्यंत ठोंब्याप्रमाणे बसून काम करत आहे. काम करत नाही तर त्यांची कामं वेगळ्या पद्धतीने सुरु आहेत. सरकारमध्येचं सरळ दोन गट पडले आहेत, तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघतो. हे तुमचं तुम्ही बघावाले, आहेत त्यांच सरकार हे ४० आमदारांच्या पलीकडे नाहीत. ४० आमदारांची ख्याल उशाली किंवा खुश करणं हे त्यांचे सरकार, असा आरोप राऊतांनी केला आहे.

- Advertisement -

राज्यात २०२४ आधी सत्ता परिवर्तन होऊ शकेल

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण परिवर्तनाच्या दिशेने बदलत आहे. २०२४ ची तयारी सुरु आहे, पण त्याआधीही परिवर्तन होऊ शकेल, मी म्हणालो तसं, हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, हे मत पक्क आहे. जर न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही, येईल अस वाटत नाही. तर संविधान, घटना आणि कायदा याचं उल्लंघन करणारे बेकायदा सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही. कायदा आणि संविधानानुसार, १६ आमदार अपात्र ठरतील. म्हणून सरकारकडून वेळकाडू धोरण सुरु आहे, असा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे.

शिवसेना हा एक महावृक्ष, त्याखालचा कचरा काही लोकं उचलून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेतायत

राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना एकचं, हे गट तट चालू आहे ते तात्पुरतं आहे. शिवसेना एकचं आहे आणि एकचं राहील. शिवसेना हा एक महावृक्ष आहे आणि या महावृक्षाचे बीज बाळासाहेबांनी रोवलं आहे. महावृक्ष फोफावतो, वाढतो, पाचोळा होतो, कचरा होतो तो कचरा काही लोकं उचलून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेत आहेत. नाशिक आणि इतर ठिकाणची कचरपट्टी उचलून नेत आहेत आणि त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषण करत आहेत. कचरा हा आग लावण्यासाठी असतो आणि त्याचा धूर फार काळ राहत नाही, अशी गंभीर टीका राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे.

- Advertisement -

सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं काही घडलं नाही असं काम करतयं 

हिवाळी अधिवेशनात राज्यातील सरकारमधील गोंधळ जवळून पाहता आला. राज्यात सरकार अस्तित्वात नाही. आश्चर्य वाटत की, रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर येत असताना सुद्धा सरकार गेंड्याच्या कातडीप्रमाणे बसून होते. मुख्यमंत्र्यांच्या भूखंडाची दोन प्रकरणं आली, त्यानंतर अब्दुल सत्तारांच्या भूखंडाची दोन प्रकरणं आली. उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचे प्रकरण आता समोर आलं. अधिवेशन काळात अशी अनेक प्रकरण समोर येऊन सुद्धा सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं जणू काही घडलंच नाही, विरोधी पक्षचं गुन्हेगार आहे अशापद्धतीने काम करत आहे, असा आरोपही राऊतांनी केला आहे.


सानियाचा कोर्टला अलविदा; पुढच्या महिन्यात शेवटचा सामना

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -