घरदेश-विदेशआयकर अधिकारी रॉबर्ट वाड्रांच्या घरी

आयकर अधिकारी रॉबर्ट वाड्रांच्या घरी

Subscribe

बेनामी संपत्ती प्रकरणी घेतला जबाब

सोमवारी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी बेनामी संपत्ती प्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचा जाब नोंदवून घेतला आहे. तपासाशी संबंधित असणार्‍या एका आयटी विभागाच्या सूत्राने याबाबतची माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, बेनामी संपत्ती प्रकरणात जाब नोंदवण्यासाठी आयकर विभागाची टीम रॉबर्ट वाड्राच्या सुखदेव विहार येथील कार्यालयात पोहोचली होती.

रॉबर्ट वाड्रा यांनी लंडनस्थित ब्रायनस्टन स्क्वेअर येथे 1.9 दशलक्ष डॉलर्स किमतीचे घर विकत घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँडरिंगचा आरोप आहे. वाड्रा सध्या अटकपूर्व जामिनावर बाहेर आहेत. आयटी विभागाव्यतिरिक्त अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मनी लॉन्ड्रिंगच्या तरतुदीनुसार त्यांची चौकशी करत आहे.

- Advertisement -

यापूर्वी ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशीसाठी वाड्रांना सहकार्य करत नसल्याचा आरोप केला होता. पण वाड्रांच्या वकिलांनी ईडीचे म्हणणे फेटाळून लावले होते. आयकर विभाग वाड्रांना जेव्हा जेव्हा चौकशीसाठी बोलवेल तेव्हा ते हजर राहतील. आतापर्यंत त्यांनी तपासात पूर्णपणे सहकार्य केले आहे, असे वाड्रांच्या वकिलांनी सांगितले.

ईडीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे रॉबर्ट वाड्रा यांनी दिली आहेत. ईडीने केलेल्या आरोपाचे खंडन करणे म्हणजे त्यांना तपासात सहकार्य न करणे असा होत नाही, असेही रॉबर्ट वाड्राच्या वकिलांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -