घरताज्या घडामोडीजॅकपॉट लागला ना भाऊ; ऐन कोरोनाच्या संकटात सापडली सोन्याची खाण!

जॅकपॉट लागला ना भाऊ; ऐन कोरोनाच्या संकटात सापडली सोन्याची खाण!

Subscribe

ऐन कोरोनाच्या संकटात झारखंड जिल्ह्यात २५० किलो सोन्याची खाण सापडली आहे.

ऐन कोरोनाच्या काळात झारखंड सरकारला जॅकपॉट लागला आहे. जमशेदपूर येथे सोन्याची खाण सापडली आहे. सिंहभूम जिल्ह्यातील भीतरडारीमध्ये २५० किलो सोन्याची खाण सापडली. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाचे उपमहासंचालक जनार्दन प्रसाद आणि संचालक पंकज कुमार सिंह यांनी खाणीत सापडलेल्या सोन्यापासून ते संपूर्ण रिपोर्ट करण्याची जबाबदारी राज्याचे सचिव अबूबकर सिद्दीकी यांच्यावर सोपवली आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार खाणीत तब्बल २५० किलो सोने आढळून आले आहे.

सरकारच्या तिजोरीत १२० कोटी रुपये येण्याची शक्यता

झारखंड सरकारने खाणीत सापडलेल्या लिलावाची तयारी सुरू केली असून या सापडलेल्या सोन्यामुळे झारखंड राज्य सरकारच्या तिजोरीत १२० कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाचे संचालक पंकज कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत काम सुरु आहे. दरम्यान, या सोन्यामध्ये वेगवेगळ्या गुणवत्तेच्या सोन्याचा समावेश असून २५० किलो सोने येण्याची अपेक्षा आहे.

- Advertisement -

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणनुसार; झारखंड हे देशातील सोने मिळणारे एक राज्य आहे. यापूर्वी देखील कुंडारकोचा, पहाडी आणि पारासी अशा अनेक ठिकाणी सोने आढळून आले होते. दरम्यान, राज्यात आणखी सात ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडण्याची शक्यता असल्याचे बोले जात आहे. तसेच येत्या काही दिवसांत शोध घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे रांची ते तामाड दरम्यान सोन्याच्या खाणींचा शोध घेण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तर बर्‍याच ठिकाणी स्वर्णरेखा नदीच्या वाळूमधून सोन्याचे कण देखील शोधले जात आहेत.


हेही  वाचा – स्थलांतरित मजुरांना मोठा धक्का, 256 श्रमिक विशेष गाड्या रद्द

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -