घरताज्या घडामोडी'Apple'ने रचला नवा इतिहास ; 3 ट्रिलियन डॉलर बाजारमूल्य असलेली ठरली पहिली...

‘Apple’ने रचला नवा इतिहास ; 3 ट्रिलियन डॉलर बाजारमूल्य असलेली ठरली पहिली कंपनी

Subscribe

1976 मध्ये अ‍ॅपल ही टेक कंपनी सुरु झाली. हा नवा इतिहास रचण्यासाठी या कंपनीला 42 वर्षांचा मोठा पल्ला गाठवा लागला.ऑगस्ट 2018 मध्ये एक ट्रिलियन डॉलर्सचा जादुई आकडा गाठला आहे.

टेक कंपन्यांनमधील प्रसिद्ध कंपनी म्हणून अ‍ॅपल (Apple) या कंपनीची ओळख आहे. या अ‍ॅपल टेक कंपनीने नवा इतिहास रचला आहे. सोमवारी या टेक कंपनीची 3 ट्रिलियन डॉलर इतके बाजारमूल्य झाले आहे. अ‍ॅपल या कंपनीचे बाजारमूल्य वॉलमार्ट,डिस्ने,नेटफ्लिक्स,नायके,एक्सॉन मोबिल, कोका-कोला,कॉमकास्ट,मार्गन स्टॅनले,मॅकडोनाल्ड,एटी अॅंड टी,गोल्डमन सॅक्स,बोइंग,आयबीएम आणि फोर्ड यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. एका वृत्तानुसार, 1976 मध्ये अ‍ॅपल ही टेक कंपनी सुरु झाली. हा नवा इतिहास रचण्यासाठी या कंपनीला 42 वर्षांचा मोठा पल्ला गाठवा लागला.ऑगस्ट 2018 मध्ये एक ट्रिलियन डॉलर्सचा जादुई आकडा गाठला आहे. यासह, कंपनीचे बाजारमूल्य 2 वर्षानंतर 2 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त झाले होते. त्यानंतर फक्त 16 महिने आणि 15 दिवसांतच कंपनीला तीन ट्रिलियन डॉलर इतके बाजारमूल्य मिळाले.

अ‍ॅपल ही टेक कंपनी सार्वजनिक पातळीवर व्यापार करण्यासाठी हा मोठा आकडा गाठणारी पहिली कंपनी ठरली आहे. मार्केट डेटानुसार, आणखी एक कंपनी म्हणजे मायक्रोसॉफ्ट ही टेक कंपनी वर्षाच्या सुरुवातीलाच Apple च्या 3 ट्रिलियन डॉलर क्लबमध्ये सामील होऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा – Unemployment Rate: बेरोजगारीचा दर चार महिन्यांच्या उच्चांकावर; डिसेंबरमध्येच 7.91 टक्क्यांची वाढ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -