घरदेश-विदेशTRP Scam: टीआरपी वाढवण्यासाठी अर्णबने ४० लाख दिले - पार्थो दासगुप्ता

TRP Scam: टीआरपी वाढवण्यासाठी अर्णबने ४० लाख दिले – पार्थो दासगुप्ता

Subscribe

अर्णब गोस्वामीच्या चॅट प्रकरणात पार्थो दासगुप्ता यांचाही समावेश

टीआरपी घोटाळ्यामधील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या लिखित जबाबात असे म्हटले आहे की, रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडून त्यांना १२ हजार डॉलर रक्कम देण्यात आली होती. तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ४० लाख रुपये देण्यात आले होते. दासगुप्ता यांना रिपब्लिक टीव्हीच्या रेटींगमध्ये फेरफार करण्यास सांगितले होते. अशी माहिती दाखल केलेल्या आरोप पत्रातून समोर आली आहे.

मुंबई पोलिसांकडून ११ जानेवारी रोजी ३ हजार ६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रात बार्क फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचा देखील समावेश केला आहे. तसेच अर्णब गोस्वामीच्या चॅट प्रकरणात पार्थो दासगुप्ता यांचाही समावेश आहे. या आरोपपत्रात बार्कच्या माडी कर्मचाऱ्यांसह केबल ऑपरेटर आणि ५९ जणांच्या विधानांचा समावेश आहे.

- Advertisement -

टीआरपी प्रकरणातील आडीट रिपोर्टमध्ये अनेक न्यूज चॅनल, टाईम्स नाऊ, आजतक, रिपब्लिक टीव्हीसाठी बार्कचे विरष्ट अधिकारी यांच्याद्वारे टीआरपीत फेरफार आणि रेटींगच्या फिक्सिंग माहिती दिली आहे. पार्थो दासगुप्ता, रोमील रामगढिया, विकास खनचंदानी यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सर्व प्रथम नोव्हेंबरमध्ये १२ लोकांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या आरोपपत्रामध्ये दासगुप्तांचा जबाब क्राईम इंटेलिजन्स युनिटने नोव्हेंबरमध्ये रेकॉर्ड केला होता.

बार्कचे माजी सीईओ दासगुप्ता यांनी सांगितले की, २००४ पासून मी अर्णब गोस्वामीला ओळखतो. टाईम्स नाऊमध्ये आम्ही सोबत काम केले आहे. बार्कचा सीईओ म्हणून मी २०१३ मध्ये कामकाज सुरु केले. अर्णब गोस्वामीने २०१७ साली रिपब्लिक चॅनल सुरु केले. परंतु चॅनल सुरु करण्यापूर्वी अनेकदा गोस्वामी यांनी माझ्याशी संवाद साधला आणि योजनांबाबत चर्चा केली होती. यामध्ये त्यांनी रेटींगसाठी मदत करण्याचे म्हटले होते. कारण गोस्वामी यांना माहिती होते की, टीआरपी प्रणाली कशी काम करते? असे दासगुप्ता यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

गुन्हे शाखेने मागच्या महिन्यात न्यायालयात टीआरपी वाढविण्यासाठी रिपब्लिक टीवीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला होता. दासगुप्ता यांनी दिलेल्या जबाबात असेही म्हटले होते की, रिपब्लिक टीव्हीला प्रथम क्रमांक रेटींग मिळावी यासाठी मी आपल्या टीम सोबत काम करायचो व टीआरपीमध्ये फेरफार करायचो असे त्यांनी सांगितले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -