तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

arvind kejriwal took oath as chief minister of delhi
तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पुन्हा एकदा दिल्लीकरांनी केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. ७० जागांच्या या विधानसभेत ‘आप’ने ६२ जागा प्राप्त केल्या असून, भाजपला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. आज केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा रामलीला मैदानावर पार पडला. या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं नाही. या सोहळ्यासाठी खास दिल्लीतील जनतेला आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या साक्षीने अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनासह दिल्लीच्या विकासात योगदान देणाऱ्या, रिक्षा चालक, सफाई कामगार, बस मार्शल अग्निशमन दलाचे जवान आणि डॉक्टर यांनी विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. केजरीवाल यांनी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, राजेंद्र पाल गौतम, कैलाश गेहलोत, इमरान हुसेन यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतील.


हेही वाचा – कुमार विश्वास या सुप्रसिद्ध कवीची फॉर्च्युनर चोरीला