Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश कुस्तीपटू आंदोलकांना समर्थन देणाऱ्या बजरंग पुनियाने 'ती' पोस्ट का केली डिलिट?

कुस्तीपटू आंदोलकांना समर्थन देणाऱ्या बजरंग पुनियाने ‘ती’ पोस्ट का केली डिलिट?

Subscribe

गेल्या 16 दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर मैदानात भारतातील स्टार महिला कुस्तीपटू या आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाला पुरूष कुस्तीपटू बजरंग पुनिया याने देखील पाठिंबा दिला. पण पुनिया याने केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे कुस्तीपटूंना समर्थन देणाऱ्या नेटकऱ्यांनी पुनियावर टीकेची झोड उठवली.

गेल्या 16 दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर मैदानात भारतातील स्टार महिला कुस्तीपटू या आंदोलनाला बसल्या आहेत. भाजपचे खासदार आणि कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी याबाबतची तक्रार देखील दाखल केलेली आहे. या आंदोलनाला पुरूष कुस्तीपटू बजरंग पुनिया याने देखील पाठिंबा दिला. पण पुनिया याने केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे कुस्तीपटूंना समर्थन देणाऱ्या नेटकऱ्यांनी पुनियावर टीकेची झोड उठवली. पण यानंतर बजरंग पुनिया याने ती पोस्ट डिलीट करत सावध भूमिका घेतली. (Why did Bajrang Punia, who supports wrestler protesters, delete his post?)

काय केली होती पोस्ट?
एकीकडे कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देणे आणि दुसरीकडे इन्स्टाग्राम पोस्ट करण्याने कुस्तीपटू बजरंग पुनियावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. “मी बजरंगी आहे. मी बजरंग दलाचं समर्थन करतो. जय श्रीराम, असं पूनियाने इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं होतं. सर्व बजरंगी भक्तांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर डीपी आणि स्टेट्सवर हा मेसेज ठेवावा. जय श्रीराम,” अशी पोस्ट पुनियाने शेअर केली होती.

- Advertisement -

या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी बजरंग पुनिया याला चांगलेच सुनवले. त्यामुळे काही वेळातच त्याने ही पोस्ट त्याच्या अंकाउंटवरून डिलीट केली. नेटकरी त्याच्यावर टीका करू लागल्याने त्याची त्यावेळी चांगलीच कोंडी झालेली पाहायला मिळाली.

कुस्तीपटूंच्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी दिला पाठिंबा
जंतरमंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज 16वा दिवस आहे. भाजपचे खासदार आणि कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तर आता या आंदोलनाला शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. आज (ता. 08 मे) जंतरमंतरवर आंदोलनाला बसलेले कुस्तीपटू आणि शेतकरी हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

- Advertisement -

तर बृजभूषण सिंह यांनी त्यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर एक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हंटले होते की, माझ्यावरील एका कुस्तीपटूचा आरोप जर सिद्ध झाला तर मी गळफास घेईन. तर कुस्तीच्या संपाला पाठिंबा देणाऱ्या संघटनांना विनंती करण्याच्या स्वरात ब्रृजभूषण शरण सिंह म्हणाले, तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या आजूबाजूला कुस्ती खेळणारा कोणताही मुलगा, मग तो पुरुष पैलवान असो किंवा महिला कुस्तीपटू त्यांना हा ब्रिजभूषण खरच रावण आहे का हे त्याला खासगीत विचारा. तो दुष्ट आहे का? असं विचारा, तुम्हाला सत्य कळेल. हे एक, दोन, चार, सहा, 10 पैलवान सोडले तर कोणाला विचारा की, मी 11 वर्षांत देशाच्या कुस्तीसाठी काय केले नाही? आता आमच्यावर असे आरोप केले जात आहेत.


हेही वाचा – आता कोणी ‘हिंदुत्ववादी सरकार’च्या राज्यातील महाराष्ट्र स्टोरी बनवेल का? काँग्रेसचा सवाल

- Advertisment -