घरCORONA UPDATE...नाहीतर २३ एप्रिलला IMAचे डॉक्टर काळा दिवस पाळणार

…नाहीतर २३ एप्रिलला IMAचे डॉक्टर काळा दिवस पाळणार

Subscribe

कोरोनाच्या विरोधात लढणारे आयएमएचे डॉक्टर २३ एप्रिल हा काळा दिवस पाळणार आहेत.

कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर २२ मार्च रोजी सर्व देशात टाळी-थाळीनाद करण्यात आला. तर ५ एप्रिल रोजी दिवा, मेणबत्ती पेटवून आरोग्य सेवा देणाऱ्या देवदूतांना कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पण, याचा मूळ हेतू किती लोकांच्या लक्षात आला कुणास ठाऊक. कारण ज्यांच्यासाठी थाळीनाद केला, रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे मेणबत्या लावल्या त्यांच्यावरच आता आंदोलनाची वेळ आली आहे. डॉक्टरांवरचे हल्ले थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने अध्यादेश काढावा नाहीतर २३ एप्रिलला काळा दिवस पाळण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे.

दरम्यान, हा काळा दिवस पाळण्याच्या एक दिवस आधी सरकारला व्हाईट अलर्ट देण्याचेही नियोजन इंडियन मेडिकल असोसिएशनने केले आहे. २२ एप्रिल, बुधवारी रात्री ९ वाजता सर्व डॉक्टरांनी आपले पांढरे कोट परिधान करत मेणबत्ती पेटवून शांततेत हल्ल्यांचा निषेध करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

- Advertisement -

यासाठी घेण्यात आला आंदोलनाचा निर्णय

डॉक्टरांवर या आधी देखील अनेकदा रुग्णांच्या पालकांकडून हल्ले केले जात होते. अशा बऱ्याच घटना यापूर्वी देखील घडल्या होत्या. मात्र, सध्या कोरोना सारख्या महामारीच्या संकटात देखील हे प्रकार सुरुच असल्याचे दिसून येत आहे. रविवारी अशीच एक घटना घडली होती. चेन्नईमध्ये कोरोनामुळे एका डॉक्टराचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीलाही लोकांनी विरोध केला होता. तसेच लोकांनी रुग्णवाहिकेवर देखील दगडफेक केल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतरही लोकांनी त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध केला असल्यामुळे डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, मुंबईतल्या नर्सेसना देखील सोसायटीत नीट वागणूक देत नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने अध्यादेश काढून हे हल्ले थांबवण्यासाठी पाऊले उचलावी अशी डॉक्टरांची मागणी आहे. आता डॉक्टरांच्या या आंदोलनाला देशभरातून कसा प्रतिसाद मिळतो आणि त्यावर सरकारकडून काही प्रतिक्रिया येणार का हे पहावे लागणार आहे.


हेही वाचा – रॅपीड टेस्ट किटमध्ये उणिवा; दोन दिवस चाचणी किट वापरू नका – ICMR

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -