घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या हॅरिस पार्कचे नामकरण 'लिटिल इंडिया'

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या हॅरिस पार्कचे नामकरण ‘लिटिल इंडिया’

Subscribe

नवी दिल्ली : सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये मंगळवारी (23 मे) ‘मोदी-मोदी’चा आवाज घुमला. पंतप्रधान मोदींनी याठिकाणी 20 हजारांहून अधिक भारतीयांना संबोधित करत आहेत. भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले. ऑस्ट्रेलियात मोदींच्या उपस्थितीत सिडनीच्या पश्चिमेकडील हॅरिस पार्कचे नामकरण ‘लिटिल इंडिया’ करण्यात आले आहे. हॅरिस पार्कमधील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे किंवा भारताशी काही ना काही संबंध आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी बॉस आहेत!’ असा उल्लेख केला आहे.

परदेशातील भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “ऑस्ट्रेलियातील भारतीय जनतेविषयी खूप प्रेम आहे. आमच्याकडे भाषा वेगळी बोलली जात आहे, तरी सुध्दा आम्ही त्यांच्याशी जोडलो गेलो आहोत. मी 2014 मध्ये आलो होतो तेव्हा तुम्हाला एक वचन दिले होते की, तुम्हाला पुन्हा भारताच्या कोणत्याही पंतप्रधानासाठी 28 वर्षे वाट पाहावी लागणार नाही. आज सिडनीमध्ये मी पुन्हा आलो आहे आणि माझ्यासोबत पंतप्रधान अल्बानीजही आले आहेत.”

- Advertisement -

“ऑस्ट्रेलिया आणि भारतातील लोकांमध्ये खूप चांगले संबंध आहेत. अल्बेनीज जेव्हा मार्चमध्ये भारतात आले होते, तेव्हा त्यांनी गुजरातमध्ये होळी साजरी केली आणि दिल्लीतील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. हे अविस्मरणीय क्षण होते. मी जिथेही जातो तिथे मला ऑस्ट्रेलिया आणि भारतातील लोकांमध्ये एक घट्ट नाते असल्याचे जाणवते. त्यामुळे तुम्हाला जर भारत समजून घ्यायचा असेल तर ट्रेन आणि बसने प्रवास करा, असा सल्लाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

- Advertisement -

मोदींनी या रस्त्यांची घेतली नावे 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ऑस्ट्रेलियातील लोक मोठे मनाचे आहेत, ते भारतातील विविधता मनापासून स्वीकारतात. यासोबतच मोदींनी मस्करीच्या अंदाजात सांगितले की, पैरामाटा स्क्वायर अनेक लोकांसाठी परमात्मा चौक बनते, तर कधी कधी याठिकाणी असलेला हॅरिस पार्क लोकांसाठी हरीश पार्क बनतो. ऑस्ट्रेलियातील दिल्ली स्ट्रीट, बॉम्बे स्ट्रीट, काश्मीर अव्हेन्यू आणि मलबार अव्हेन्यू हे रस्ते ऑस्ट्रेलियाला भारताशी जोडतात, असा संबंध पंतप्रधान मोदी यांनी सांगितला. त्यांनी यावेळी हॅरिस पार्कमधील जयपूर स्वीट्सची चटकाज ‘चाट’ आणि जयपूर स्ट्रीटची ‘जलेबी’ खूप चवदार असल्याचे ऐकून आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझा मित्र ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज यांना त्या ठिकाणी घेऊन जा, अशी इच्छा मोदींनी ऑस्ट्रेलियातील भारतीयांकडे व्यक्त केली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -