घरदेश-विदेशअयोध्या प्रश्नी 'तारीख पे तारीख'

अयोध्या प्रश्नी ‘तारीख पे तारीख’

Subscribe

सरन्यायधीश रंजन गोगोई यांनी २९ जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे न्यायमूर्ती यू. यू. लळित यांच्या जागी आता नवीन न्यायधीशांचा समावेश केला जाणार आहे.

अयोध्येतील वादाप्रश्नी आता २९ जानेवारीला सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती यू. यू. लळित यांनी घटनापीठातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त  केली. परिणामी आता नवीन घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. सकाळी १०.३० वाजता अयोध्याप्रश्नी सुनावणीला सुरूवात झाली. कामकाज सुरु होताच मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी वाद-प्रतिवादाला सुरुवात केली. दरम्यान, आपण सुनावणीच्या पुढील तारखा आणि कालमर्यादांवर चर्चा करणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले.

सुनावणीला सुरूवात होताच राजीव धवन यांनी न्यायमूर्ती यू. यू. लळित यांच्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. लळित यांनी बाबरी मश्जिद प्रकरणातील आरोपीची बाजू वकिल असताना मांडली होती. त्याच्या आधारे  राजीव धवन यांनी घटनापीठामध्ये लळित यांचा समावेश असण्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर न्यायमूर्ती यू. यू. लळित यांनी देखील अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीपासून लांब राहण्याची इच्छा व्यक्त केली. या साऱ्या घडामोडीनंतर सरन्यायधीश रंजन गोगोई यांनी २९ जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे न्यायमूर्ती यू. यू. लळित यांच्या जागी आता नवीन न्यायधीशांचा समावेश केला जाणार आहे. आता २९ जानेवारीला नवीन घटनापीठापुढे नियमित सुनावणीची तारीख  निश्चित केली जाणार आहे.

- Advertisement -

निवडणुका आणि राम नामाचा गजर

२०१९च्या निवडणुका आता जवळ आल्यानं अयोध्येमध्ये राम मंदिर झाले पाहिजे अशी मागणी हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांकडून जोर धरत आहे. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील आता अयोध्येमध्ये राम मंदिर झालंच पाहिजे अशी मागणी केली आहे. शिवसेनेनं भाजपला २०१४ साली दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. दरम्यान भाजपनं मात्र सारं प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचं म्हणत संयमाची भूमिका घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -