घरताज्या घडामोडीगोव्यात जातायत? पण आता मद्य महाग होतंय - गोवा सरकारचा निर्णय

गोव्यात जातायत? पण आता मद्य महाग होतंय – गोवा सरकारचा निर्णय

Subscribe

मद्यप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे, आता गोव्यात दारू महागणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी यासंदर्भात घोषणा केली.

गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात निळेशार समुद्रकिनारे.. किनाऱ्यावरचे शॅक्स आणि बार. या सर्व ठिकाणी नदीसारखी वाहणारे मद्य. तेही खिशाला परवडेल असं. पण मद्यपींना आता या मजेसाठी आपला खिसा रिकामा करावा लागू शकतो. कारण गोव्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी दारू आणि संपत्ती विकत घेण्यावर जास्त कर लावणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे आता गोव्यामध्ये दारू महागणार आहे. या दरवाढीमुळे राज्य सरकारच्या महसूलात मोठ्याप्रमाणावर भर पडणार आहे. गोवा सरकारचा महसूल जरी यामुळे वाढणार असला तरी पर्यटकांचा मात्र खिशाला कात्री लागणार आहे.

‘फेणी’या मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ

विशेष म्हणजे गोव्यात तयार होणाऱ्या ‘फेणी’या मद्यावरही उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. आता फेणीची किंमत एका बाटलीमागे १०० ते २०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर बिअरची किंमत ५ ते १५ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. दर वाढल्याने पर्यटनाला त्याचा फटका बसेल, अशी भीती गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीने व्यक्त केली आहे. बांधकाम क्षेत्रात आधीच मंदी आहे, त्यात कर-दर वाढवल्याने या क्षेत्राला आणखी फटका बसेल अशी भीतीही वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

गोव्यात घर घेणं आता महागणार

गोव्यात निळ्याशार समुदाकडे तोंड असलेले आणि भोवती नारळीपोफळींच्या बागा असलेलं ‘घर’ हे बऱ्याच जणांचे स्वप्न असते. परंतु यापुढे असे स्वप्न सामन्य माणसाच्या खिशाला परवडेल की नाही? असा प्रश्न पडतो. कारण, आता गोव्यात घर घेणे महागणार आहे. गोव्याचे अर्थमंत्री प्रमोद सांवत यांनी रेडी रेकनरच्या दरात बदल करण्याचं ठरवलं असून यामुळे गोव्यात घर घेणं आता २० टक्क्यांनी महागणार आहे. तसेच आम्ही करात किरकोळ वाढ केली आहे त्यामुळे सामान्य माणसावर यामुळे आर्थिक भार येणार नाही असं सावंत यांनी म्हंटल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -