घरताज्या घडामोडीऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील BAPS स्वामीनारायण मंदिरात तोडफोड

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील BAPS स्वामीनारायण मंदिरात तोडफोड

Subscribe

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील BAPS स्वामीनारायण मंदिरात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरवार 12 जानेवारी रोजी सकाळी ही घटना घडली.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील BAPS स्वामीनारायण मंदिरात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरवार 12 जानेवारी रोजी सकाळी ही घटना घडली. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या उत्तरेकडील उपनगरातील मिल पार्कमध्ये असलेल्या BAPS स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

स्वामीनारायण मंदिरावरील हल्ल्यानंतर BAPS यांनी एक निवेदन काढले आहे. या निवेदनात BAPS यांनी स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर विनाश आणि द्वेषाच्या धक्कादायक घोषणा लिहिण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच, या हल्ल्याचा BAPS यांनी निषेध केला आहे. याशिवाय, “आम्हाला या रानटी आणि द्वेषाच्या कृत्यांमुळे दुःख आणि धक्का बसला आहे. आम्ही शांतता आणि सौहार्दासाठी आमची प्रार्थना करतो आणि लवकरच या घटनेबद्दल अधिक तपशील शेअर करू”, असेही म्हटले.

- Advertisement -

यासोबतच खलिस्तान ग्रुपने भारतीय दहशतवादी जर्नेल सिंग भिंडरावाले याचे कौतुक केल्याचेही या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, भिंडरावाले हे ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान मारले गेलेल्या खलिस्तानी शीख राज्याचे व्यापक समर्थक होते.

खासदार इव्हान मुलहोलँड यांनी निषेध केला

- Advertisement -

नॉर्दर्न मेट्रोपॉलिटन रीजनचे उदारमतवादी खासदार इव्हान मुलहोलँड यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. शिवाय, “मंदिराची ही तोडफोड व्हिक्टोरियातील शांतताप्रिय हिंदू समुदायाला, विशेषत: या पवित्र वेळी अत्यंत त्रासदायक आहे” अशी माहिती खासदार इव्हान मुलहोलँड यांनी ऑस्ट्रेलिया टुडेला दिली.

दरम्यान, अमित सरवाल नावाच्या पत्रकाराने इंडिया टुडेला सांगितले की, “मेलबर्नमध्ये राहणाऱ्या हिंदू समुदायाने पोलिस आणि खासदारांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. येथील सांस्कृतिक मंत्रीही ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणचे आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू आहे”. दरम्यान, केरळ हिंदू संघटनेनेही या घटनेचा निषेध केला आहे.


हेही वाचा – मुंबई पालिकेतील ‘या’ प्रकल्पावरून ठाकरे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -