घरदेश-विदेशबेळगावात शिवसेनेच्या रुग्णवाहीकेवर हल्ला, सीमाभागात तणाव

बेळगावात शिवसेनेच्या रुग्णवाहीकेवर हल्ला, सीमाभागात तणाव

Subscribe

बेळगाव शहरातील रामलिंग खिंड येथे काही कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या रुग्णवाहीकेवर हल्ला केला. यावेळी रुग्णवाहीकेचा बोर्ड तोडण्यात आला तसेच गाडीला काळे फासण्याचाही प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण भागात पोलीस बंदोबस्त असताना समाजकंटकांनी हे कृत्य केले. शिवसेनेच्या कार्यकत्यांनी त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता कन्नड कार्यकर्त्यांनी तिथून पळ काढला.

तर बेळगावमध्ये शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न कन्नड कार्यकर्त्ये करत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केला. दरम्यान, सोमवारी (8 मार्च) रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव महानगरपालिकेसमोर अनधिकृतपणे लावण्यात आलेला ध्वज काढण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी भगवा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कर्नाटक पोलिसांनी 6 महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले. त्यानंतर बेळगाव शहरात बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -