तरुणांनी रेल्वे स्थानकावर फेकला ड्रम, आत जे काही दिसलं ते पाहून सगळेच हादरले

रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत एक ड्रम आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी येऊन ड्रमची पाहणी केली.

Bengaluru Railway Station Drum Dead Body

बंगळुरुमधील बैप्पनहल्ली रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत एक ड्रम आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी येऊन ड्रमची पाहणी केली. ड्रममध्ये जे दिसलं ते पाहून संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली. या ड्रममध्ये बॉम्ब तर ठेवला नाही ना या दृष्टीने तपास करायला गेलेल्या पथकाला दुसरंच काही दिसून आलं. या ड्रममध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास तिघांनी रिक्षात ड्रम आणून रेल्वे स्टेशनवर फेकले. हा ड्रम कपड्याने झाकण्यात आला होता. तसंच वरती झाकण ठेवण्यात आलं होतं. मृत महिलेचं वय 31 ते 35 दरम्यानचं आहे. तिची ओळख अद्याप पटलेली नाही. सीसीटीव्ही फुटेजवरून हे उघड झाले आहे. आता फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये तीन महिन्यातील ही तिसरी घटना असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान मृतदेह मछलीपट्टणम येथून ट्रेनने आणण्यात आला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचं एक पथक मछलीपट्टणम येथे गेलं होतं. पण महिलेची अद्याप ओळख पटू शकली नाही, असं बंगळुरु रेल्वे पोलीस अधिक्षक डॉक्टर सोमलथा यांनी सांगितलं आहे.

पहिल्या प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नाही तोच दुसरा मृतदेह ड्रममध्ये बंद अवस्थेत पोलिसांना सापडला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लवकरच या प्रकरणाची उकल होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.