घरदेश-विदेशकॉम्प्युटर पाहिला नाही, पण सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचं स्वप्न; राहुल गांधींनी मुलाला दिला मदतीचा हात

कॉम्प्युटर पाहिला नाही, पण सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचं स्वप्न; राहुल गांधींनी मुलाला दिला मदतीचा हात

Subscribe

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी समाजातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांची गाठीभेटी आनंदाने स्वीकारताना दिसतायतं. अशात राहुल गांधी यांनी एका तरुणाप्रती दाखवलेल्या संवेदनशीलतेचे आज सर्वत्र कौतुक होत आहे. राहुल गांधींनी नांदेडमधील सर्वेश हाटणे या मुलास लॅपटॉप भेट दिला आहे.

दिल्लीतील अनेक काँग्रेस नेते आज भारत जोडो यात्रेनिमित्त नांदेडमध्ये आलेत हे पाहून सर्वेश देखील यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी आला. राहुल गांधींनी त्याची भेट घेतली. यावेळी राहुल गांधींनी सर्वेशला विचारलं तुला मोठं होऊन काय बनायचंय. ज्यावर सर्वेशने मला सॉफ्टवेअर इंजिनीअर बनायचंय असं सांगितलं. यानंतर आजवर तु कॉम्प्युटर पाहिला का? असा प्रश्नही राहुल गांधींनी यावेळी विचारला. ज्यावर सर्वेशने नाही असं उत्तर दिलं.

- Advertisement -

यावेळी राहुल गांधी यांनी संवदेनशीलता दाखवत आज मुलाला लॅपटॉप भेट दिला. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत त्या लहानग्या सर्वेशनला लॅपटॉप भेट देण्यात आला. दरम्यान राहुल गांधी यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. राहुल गांधी यांच्या या संवेदनशीलतेचे मनसेही कौतुक केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी राहुल गांधींच्या संवेदनशीलतेवर एक ट्विट करत, संवेदनशीलता जिवंत राहो, अशी भावना व्यक्त केली.

- Advertisement -

भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडच्या वाटेवर राहुल गांधी यांना दोन मुलांनी मोठेपणी सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याचे स्वप्न बोलून दाखवले. पण या मुलांनी आजवर कधी कॉम्प्युटर पाहिला नाही तसेच त्यांच्या शाळेतही कॉम्प्युटर नसल्याचे सांगितले. शाळेतचं कॉम्प्युटर नाही तर ही मुलं आपलं स्वप्न कसं पूर्ण करणार हे जाणून घेत राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यातील एका मुलाला लॅपटॉप भेट दिला. यामुळे मुलाच्या स्वप्नाला आता बळ मिळाले आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, ही तर एका मुलाची गोष्ट झाली, पण आपले हिंदुस्तानातील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न आहे. या घटनेत राहुल गांधींनी चिमुकल्यासोबत साधलेल्या संवादाचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावक तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर लाखो लोकांनी लाईक्स आणि कमेंट्स आणि शेअरिंगचा वर्षाव केला आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यात्रा सध्या नांदेडमधून पायी जात आहे. या यात्रेदरम्यान त्यांना असंख्य नागरिक येऊन भेटतात, गाळाभेट घेत आहेत, आपल्या जुन्या आठवणी ताज्या करत आहेत. यात लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण सहभाग आहे. या सगळ्यांमध्येच नांदेडमधला सर्वेश हाटणे हा एक चिमुकला होता.


हेही वाचा : शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला, त्यांच्या ताब्यात जर…; बावनकुळेंची घणाघाती टीका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -