Bihar Road Accident : बिहारच्या पूर्णियामध्ये भीषण अपघात; ट्रक उलटल्याने 8 मजुरांचा मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार सर्व मजूर राजस्थानचे रहिवासी होते. ट्रक आगरतळ्याहून जम्मू-काश्मीरला जात होता.

Bihar bhagalpur road accident in eight laborers died in purnia after truck overturned all from rajasthan
बिहारच्या पूर्णियामध्ये भीषण रस्ते अपघात; ट्रक उलटल्याने 8 मजुरांचा मृत्यू

बिहारच्या (Bihar) पूर्णियामध्ये सोमवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला आहे. ट्रक उलटल्याने आठ मजुरांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे. या घटनेत अनेक जखमी झाल्याची माहिती देखील समोर येतेय. अपघातग्रस्त ट्रक बोरबेलचा अवड़ सामान घेऊ जात होता. मात्र अचानक ट्रक पलटी झाल्याने सर्व कामगार लोखंडी पाण्याच्या पाईपखाली गाडले गेले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचे फोटो अतिशय वेदनादायी आहेत. राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. (Big Road Accident In Bihar)

इंदिरानगर बोगद्याजवळ कार पुलावरून खाली कोसळली

या अपघातावेळी ट्रकमध्ये चालक आणि उपचालकासह एकूण 16 जण होते. बहुतांश कामगार ट्रकवर लावलेल्या लोखंडी पाईपच्या वर बसले होते. राष्ट्रीय महामार्ग 57 वरील जलालगढ पोलीस स्टेशन हद्दीतील दार्जिया बडीजवळ हा लोखंडी पाईपने भरलेला ट्रक जात होता. मृतांमध्ये ईश्वर लाल, वासू लाल, काबा राम, कांती लाला, हरीश, मणि लाला, दुष्मंत, एका अनोळखीचा समावेश आहे. हे सर्व राजस्थानच्या उदयपूर खैरवाडा येथील असल्याचे सांगितले जात आहे. (Laborers Of Rajasthan)

प्राथमिक माहितीनुसार सर्व मजूर राजस्थानचे रहिवासी होते. (Major Road Accident In Bihar) ट्रक आगरतळ्याहून जम्मू-काश्मीरला जात होता. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात अर्धा डझन मजूर जखमी झाले असून, बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. घटनास्थळी जेसीबीने ट्रक उचलण्यात आला आहे. तसेच दबलेल्या मजुरांची सुटका करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जलालगड आणि कसबा पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.


आसामचे मुख्यमंत्री म्हणतात, मदरसा हा शब्द आता संपुष्टात आला पाहिजे