घरताज्या घडामोडीCorona: कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

Corona: कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

Subscribe

सुनिल कुमार सिंह यांच्या निधनाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी दुःख व्यक्त केले.

सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येप्रमाणे मृतांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. दरम्यान मंगळवारी कोरोनामुळे बिहारमधील भाजप आमदार सुनिल कुमार सिंह यांचं निधन झालं आहे. बिहारमध्ये कोरोनामुळे नेत्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. सुनिल कुमार सिंह हे ६६ वर्षाचे होते. त्यांचा निधनाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘सुनिल सिंह यांच्या निधनामुळे राजकारण आणि समाजाचे कधीही भरून न येणार नुकसान झालं आहे’, असं बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले.

बिहारचे सुनिल सिंह हे लोकप्रिय नेता होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. सिंह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर १३ जुलै रोजी पाटणा येथील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती नोडल अधिकारी संजीव कुमार यांनी दिली. संजीव कुमार म्हणाले की, ‘कोरोनामुळे सुनिल कुमार सिंह यांचा मृत्यू झाला असून त्यांना मधुमेह आणि हायपरटेंशनचा त्रास होता. शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.’

- Advertisement -

या कोरोनाच्या काळात बिहारमधील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजप आमदार जिबेश कुमार मिश्रा, मंत्री विनोद कुमार सिंह, राजद आमदार शाहनवाझ आलम, काँग्रेस आमदार आनंद शंकर सिंह आणि जेडीयू आमदार खालिद अन्वर यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.


हेही वाचा – Corona: मुंबईतला पहिला हॉटस्पॉट कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -