घरCORONA UPDATELockdown Effect: Linkedin ने घेतला कपातीचा निर्णय, 'या' कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा!

Lockdown Effect: Linkedin ने घेतला कपातीचा निर्णय, ‘या’ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा!

Subscribe

कोरोना व्हायरसमुळे रिक्रुटमेंटमध्ये प्रोडक्ट्सची मागणी घटल्याने कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं

कोरोना व्हायरसमुळे देशात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे अनेक मोठ्या कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे. प्रसिध्द प्रोफेशनल सोशल नेटवर्किंग वेबसाइट Linkedin ने ९०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगभरातील अनेक कंपन्या Linkedin चा वापर करतात. कंपनीत योग्य उमेदवाराचा शोध घेण्यासाठी अनेक कंपन्या याचा वापर करतात. तर उमेदवार, कर्मचारी Linkedin चा वापर नवीन नोकरी शोधण्यासाठी करत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये प्रोफेशनल सर्कलमध्ये LinkedIn विशेष लोकप्रिय आहे. या कंपनीने जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येच्या ६ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असल्याचे जाहीर केले. LinkedIn ने आपल्या वेबसाइटवर एक पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली.

- Advertisement -

कोरोना व्हायरसमुळे रिक्रुटमेंटमध्ये प्रोडक्ट्सची मागणी घटल्याने कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. सेल्स आणि डिव्हिजनधील कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी गमवावी लागेल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नोकरीवरुन कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना १० आठवड्यांचा पगार दिला जाईल, असं सांगितलं. नोकरीवरुन कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना या आठवड्यात याबाबत माहिती दिली जाणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – लॉकडाऊनमुळे भीक मागणाऱ्यांमध्ये लहान मुलांचे प्रमाण वाढले!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -