घरदेश-विदेशराम मंदिर भाजपचा एकाधिकार नाही; उमा भारतींचा शिवसेनाला पाठिंबा

राम मंदिर भाजपचा एकाधिकार नाही; उमा भारतींचा शिवसेनाला पाठिंबा

Subscribe

राम मंदिरावर भाजपाचा एकाधिकार नाही असे सांगत उमा भारती यांनी प्रभू राम सर्वांचे असल्याचे सांगितले. या मुद्द्यावर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि अकाली दलासह अन्य पक्षांनी साथ द्यावी’, असे विधान उमा भारती यांनी केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसाचा आयोध्या दौरा केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी राम फक्त भाजपचे नाही असे म्हटले होते. उध्दव ठाकरे यांच्या याच्या याच मतावरुन भापच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी मोठे विधान केले आहे. उमा भारती यांनी असे सांगितले की, उध्दव ठाकरे यांच्या या मताला माझा पाठिंबा आहे. राम मंदिरावर भाजपाचा एकाधिकार नाही असे सांगत उमा भारती यांनी प्रभू राम सर्वांचे असल्याचे सांगितले. या मुद्द्यावर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि अकाली दलासह अन्य पक्षांनी साथ द्यावी’, असे विधान उमा भारती यांनी केले आहे.

- Advertisement -

उध्दव ठाकरेंचे प्रयत्न कौतुकास्पद

उध्दव ठाकरे यांनी अयोध्ये दौऱ्या दरम्यान भाजपवर टीका केली. कुंभकर्णाच्या झोपेतून जागे व्हा आणि राम मंदिर उभारण्याची तारीख जाहीर करा, असे आव्हान उध्दव ठाकरे यांनी मोदी सरकारला दिले होते. उध्दव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर केंद्रीय मंत्री उमा भारती यांना प्रश्न विचारले असता त्यांनी असे सांगितले की, उद्धव ठाकरेंचे प्रयत्न कौतुकास्पद आहे. भाजपाकडेच राम मंदिराचा एकाधिकार नाही नाही. प्रभू श्रीराम हे सर्वांचेच दैवत आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, अकाली दल, ओवेसी, आझम खान या सर्वांनीही पुढे येऊन राम मंदिराच्या उभारणीस पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मंदिर नाही तर सरकार नाही – उध्दव ठाकरे

अयोध्येच्या दौऱ्यांनतर उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. निवडणुकी आधी सगळे राम राम करतात मात्र निवडणुकीनंतर आराम केला जातो. गेल्या साडेचार वर्षात या सरकारकडून राम मंदिर उभारणीसाठी कोणतिही हालचाल झाली नाही. राम मंदिर उभारणीसाठी अध्यादेश काढा, कायदा करा किंवा काहीही करा शिवसेना तुमच्या सोबत आहे. राम मंदिरची उभारणी तुम्ही नाही करणार तर कोण करणार असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राम मंदिर नाही तर, सरकार नाही असा इशारा भाजप सरकारला दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -