घरदेश-विदेशअमित शहाचं राहणार भाजपचे अध्यक्ष

अमित शहाचं राहणार भाजपचे अध्यक्ष

Subscribe

भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ लोकसभा निवडणूक होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.

नवी दिल्लीत शनिवार पासून सुरु झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०१९ मध्ये अमित शहा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल संपणार होता. पण आता २०१९ लोकसभा निवडणूक होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.

‘अजेय भारत’ची घोषणा 

२०१९ निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने ‘अजेय भारत’ची घोषणा केली आहे. २०१९ लोकसभा निवडणूक मार्च किंवा एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या पार्शवभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. या बैठकीला भाजपच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह सर्व राज्यांतील प्रदेशाध्यक्षांनीही हजेरी लावली. बैठकीच्या उद्घाटनाच्या सत्रात ५ राज्यांमधील निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणण्याचा संकल्प करण्यात आला.

२०१९ निवडणूक जिंकण्याचा विश्वास 

अमित शहा यांनी या बैठकीत २०१९ लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहा म्हणाले, “नरेंद्र मोदींसारखा लोकप्रिय नेता भाजपमध्ये आहे. त्यांनी आतापर्यंत खूप चान्गले कार्य केले आहे. त्यामुळे २०१९ निवडणूक जिंकू याचा आम्हाला विश्वास आहे.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -