Jammu-Kashmir: जम्मूमध्ये दहशतवाद्यांचा भाजप नेत्यावर आणि त्याच्या पत्नीवर गोळीबार

BJP leader Gulam Rasool Dar, his wife shot dead by terrorists in Jammu-Kashmir Anantnag
Jammu-Kashmir: जम्मूमध्ये दहशतवाद्यांचा भाजप नेत्यावर आणि त्याच्या पत्नीवर गोळीबार

दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लाल चौक भागात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. यादरम्यान दहशतवाद्यांनी भाजप नेता गुलाम रसूल डार आणि त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. दोघांना जवळच्या रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते, मात्र दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जम्मू काश्मीरचे भाजप नेते अल्ताफ ठाकूर यांनी गुलाम रसूल डार आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘गुमाल रसूल डार कुलगामच्या भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष होते. भाजपचे पदाधिकारी असण्याशिवाय गुलाम रसूल डार हे सरपंचही होते. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत त्यांना निवडून आणले होते.’

गुलाम रसूल डार हे कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी गावातली राहणारे होते. गेल्या वर्षी त्यांनी जिल्हा विकास परिषदची निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना यात यश मिळाले नाही. पण आज दिवसा उजेडी भर चौकात त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली आहे.

निष्पाप लोकांवर हल्ला करणे आणि त्यांची हत्या करणे हे दहशतवाद्यांची निराशा दर्शवते. ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी आणि त्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा देण्याचे आवाहन अल्ताफ ठाकूर यांनी पोलिसांना केले आहे. दरम्यान जम्मू काश्मीरमधून ३७० आणि ३५ ए कलम हटवण्याचा दिवस ५ ऑगस्ट तारीख नुकतीच निघून गेली. राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्याचा संबंध याच्याशी जोडला जात आहे.


हेही वाचा – Viral Video: मास्क नसल्यामुळे लावला दंड, तर महिलेने नागरी संरक्षण महिला कर्मचारीला केली