‘गुम है किसी के प्यार मे’ अभिनेत्री रेखाची एंट्री, चाहत्यांना मिळणार खास सरप्राइज

रेखाजींची दुसऱ्या प्रोमोच्या चित्रीकरणानंतर या शो मध्ये एखादी विशेष एंट्री देखील असू शकेल.

Actress Rekhi entry Gum Hai Kisi Ke Pyaar Mein New Surprise for show fans
'गुम है किसी के प्यार मे' अभिनेत्री रेखाची एंट्री, चाहत्यांना मिळणार खास सरप्राइज

“गुम है किसी के प्यार में” सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन शो पैकी एक आहे. एक आकर्षक कहाणी आणि ट्विस्टसोबतच्या अद्भुत प्लॉटने, प्रेक्षकांना धरून ठेवले आहे. विराट आणि सई यांची प्रेम कहाणी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पुढे येणाऱ्या ट्विस्टने प्रेक्षकांना आगामी महासप्ताहासाठी अधिक उत्साहित केले आहे.

लिविंग लिजेंड रेखाजी ‘गुम है किसी के प्यार में’ सोबत आधीपासूनच जोडल्या गेल्या आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या प्रोमोमधील त्यांची जादुई उपस्थिति, चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. या शोमध्ये एक रोमांचक डेवलपमेंट पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, रेखाजींची दुसऱ्या प्रोमोच्या चित्रीकरणानंतर या शो मध्ये एखादी विशेष एंट्री देखील असू शकेल. रेखाजींच्या प्रोमोजना मिळणाऱ्या प्रतिक्रिया अद्भुत आहेत आणि स्क्रिप्टमध्ये इतके शानदार ट्विस्ट आहेत कि निर्माता या महासप्ताहाला मोठे यश मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.

गुम है किसी के प्यार में’च्या महासप्ताहाची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. सई आणि विराटबाबत चाहत्यांना अनेक प्रश्न पडत आहेत. सम्राटच्या एंट्रीने त्यांच्या प्रेम कहाणीला वेग येईल? विराट कधीच सईबाबतच्या आपल्या भावना कधीच कबूल नाही करणार? हे उत्कंठावर्धक शानदार प्रदर्शन पाहता येणार आहे.


हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचं निधन