घरमहाराष्ट्रसीईटी परीक्षेचे हॉलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध

सीईटी परीक्षेचे हॉलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध

Subscribe

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा (सीईटी सेल) मार्फत घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी पीसीबी ग्रुपमधून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहेत.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा (सीईटी सेल) मार्फत घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी पीसीबी ग्रुपमधून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरून हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमधून अर्ज भरले आहेत. त्याच विद्यार्थ्यांची हॉलतिकीटे उपलब्ध झाली आहेत.

एमएचटी-सीईटी परीक्षा १,२,४,५,६,७,८ आणि ९ ऑक्टोबरला होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा अर्ज क्रमांक आणि पासवर्डच्या सहाय्याने हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल. पीसीएम ग्रुप परीक्षेच्या हॉलतिकीटासंदर्भात नंतर सूचना देण्यात येणार आहेत. हॉल तिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी 
mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट उपलब्ध केले आहे. या लिंकवर विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन केल्यावर त्यांना हॉल तिकीट उपलब्ध होईल. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारी विषयीदेखील हॉल तिकीटावर विस्तृत माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट वरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन सीईटी सेलच्या वतीने करण्यात आले आहे. पाच लाख विद्यार्थ्यांनी पीसीएम आणि पीसीबी कोर्सेसच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -