घरताज्या घडामोडीआसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाल्याने अधिकाऱ्यांसह 20 जण बेपत्ता

आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाल्याने अधिकाऱ्यांसह 20 जण बेपत्ता

Subscribe

आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोट बुडाल्याने 20 जण बेपत्ता झाले असून, यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. आसामच्या धुबरी जिल्ह्यात ही घटना घडल्याचे समजते.

आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोट बुडाल्याने 20 जण बेपत्ता झाले असून, यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. आसामच्या धुबरी जिल्ह्यात ही घटना घडल्याचे समजते. या घटनाची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने शोध कार्य आणि बचाव कार्याला सुरूवात करण्यात आली.

आसामच्या धुबरी जिल्ह्यात असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाली. या बोटीत 50 जण प्रवास करत होते. मात्र, बोट बुडाल्याने यापैकी 20 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ जिल्हा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. ही अपघातग्रस्त बोट स्वदेशी बनावटीची यांत्रिक बोट आहे.

- Advertisement -

याबाबत आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सीईओ ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी माहिती दिली आहे. सध्या बचावकार्य सुरू असून, अधिक तपास आसाम आपत्ती व्यवस्थापन करत आहे. ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाल्याने धुबरीचे अधिकारीही अद्याप बेपत्ता असल्याचे उपायुक्त एम. पी. अनबामुथन यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, धुबरी जिल्ह्यातील भासानी नगर इथे असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीत गुरुवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या बोटीत धुबरीचे महसूल अधिकारी संजू दास यांच्यासह 20 हून अधिक लोक होते.

- Advertisement -

बोट उलटल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बोटीवरील सुमारे 20 जणांपैकी 10 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र, महसूल अधिकारी संजू दास यांच्यासह 10 जण अजूनही बेपत्ता आहेत. शोधमोहीम सुरू आहे. मात्र, अद्याप कोणाचाही पत्ता लागलेला नाही.


हेही वाचा – मोठ्या गाड्यांमध्ये आता 1 ऑक्टोबरपासून सहा एअरबॅग्स अनिवार्य; नितीन गडकरींची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -