घरमहाराष्ट्रराज ठाकरेंच्या कोकणातील सभेला मिळालं मैदान; आता 'या' ठिकाणी होणार सभा

राज ठाकरेंच्या कोकणातील सभेला मिळालं मैदान; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची 6 मे रोजी रत्नागिरीत सभा होणार आहे. ही सभा मनसेने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर घेण्याचं ठरवलं होतं. परंतु आता मनसेची सभा कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलाची पाहणी करुन हे ठिकाण सभेसाठी निश्चित केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची 6 मे रोजी रत्नागिरीत सभा होणार आहे. ही सभा मनसेने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर घेण्याचं ठरवलं होतं. सभा स्थळाचं नावही जाहीर झालं होतं. परंतु आज, शुक्रवारी मनसेचे पदाधिकारी संस्थेकडे विचारणा करण्यास गेले असता त्यांना नकार मिळाला. त्यामुळे आता मनसेची सभा कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलाची पाहणी करुन हे ठिकाण सभेसाठी निश्चित केले आहे.( MNS Raj Thackeray meeting was take Ratnagiri Education Society’s Jawahar Maidan Now meeting of MNS will Pramod Mahajan Sports Complex )

राज ठाकरे यांच्या सभेसाठी शहरातील गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे जवाहर मैदान निश्चित करण्यात आलं होतं. त्याअनुषंगाने मनसे नेते नितीन सरदेसाई शुक्रवारी रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी सभेच्या पार्श्वभूमीवर जवाहर मैदानाची पाहणी केली. शैक्षणिक संस्था असल्याने राजकीय सभांसाठी मैदान कोणालाही देत नसल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. गेली दहा वर्षे कोणत्याही राजकीय पक्षाला हे मैदान सभेसाठी देण्यात आलं नसल्याचंही सांगण्यात आलं. तसचं, सभेसाठी संस्थेकडे मनसेकडून अधिकृत कोणी आलेच नसल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

( हेही वाचा: “नेत्यांना शाही मेजवानी, श्रीसदस्य उपाशी; लाईट अॅण्ड शेड्स कंपनीत भागीदार कोण शोधा”; राऊतांचा गंभीर आरोप )

हे ठिकाण सभेसाठी निश्चित

मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी राज ठाकरे यांच्या सभेसाठी दुसरी जागा शोधली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सभेसाठी आठवडा बाजार येथील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलाची जागा निश्चित केली आहे. या जागेची नितीन सरदेसाई आणि पदाधिकाऱ्यांनी पाहणीही केली. त्यामुळे राज ठाकरे यांची रत्नागिरीत 6 मे रोजी होणारी सभा आता गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे जवाहर मैदानात न होता कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

- Advertisement -

डिसेंबर महिन्यात झालेल्या कोकण दौऱ्यात राज ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले होते. ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी मला सांगा काही बदल मला करावेच लागतील असे थेट सुतोवाच त्यांनी केला होता. दापोलीमध्ये ते बोलत होते त्यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -