घरताज्या घडामोडीपूंछमधील लष्करावरील हल्ल्यात 7 दहशतवादी असल्याचा संशय; एनआयएच्या पथकासह डीजीपी घटनास्थळी दाखल

पूंछमधील लष्करावरील हल्ल्यात 7 दहशतवादी असल्याचा संशय; एनआयएच्या पथकासह डीजीपी घटनास्थळी दाखल

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गोळीबार केला. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गोळीबार केला. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यानुसार, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांना राजौरीमधील पुंछ सेक्टरमध्ये एकाच क्षेत्राजवळ दोन गटांतील 6 ते 7 सक्रिय दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आहे. (poonch terror attack army is searching everywhere investigation team found 7 active terrorists of two groups)

मिळालेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि पाकिस्तानचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर या ठिकाणी अधिक तपास करण्यासाठी एनआयएचे पथकही शुक्रवारी दाखल झाले आहे. तसेच, ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातूनही शोध घेतला जात आहे. याशिवाय, अनेक विशेष दलांची पथके या भागात पाठवण्यात आली आहेत.

- Advertisement -

या घटनेच्या अधिक तपासासाठी लष्कर, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांसह सुरक्षा दल शोध मोहिमेत समन्वय साधत आहेत. सध्या लष्कर त्यांच्या या भागात प्रवेश करण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. लेणी आणि खडक यांसारख्या नैसर्गिक निर्मिती असलेल्या भागातही लष्कर व्यापक शोध घेत आहे.

या दहशतवादी हल्ल्यामुळे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या हल्ल्याबाबत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्याचवेळी जम्मू-काश्मीरच्या राजौरीतील जवाहर नगरमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. भाजप कार्यकर्त्यांनी ‘भारतीय सेना झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, तसेच ‘शहीद जवान अमर रहे’च्या घोषणाही दिल्या. तसेच, दहशतवाद्यांचे पुतळेही जाळण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, भारतीय लष्कराने (Indian Army) जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये (Poonch) गुरुवारी (20 एप्रिल) ट्रकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terror Attack) शहीद झालेल्या पाच जवानांची नावे जाहीर केली आहेत. हवालदार मनदीप सिंह, लान्स नायक देबाशिष बसवाल, लान्स नायक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह अशी मृत जवानांची नावे आहेत.


हेही वाचा – Gujarat Godhra Riots: गोध्रा घटनेतील 8 दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -