Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरियंटवर बूस्टर डोसचा मोठा प्रभाव, शरीरात अँटीबॉडी वाढण्यास मदत

कोविड-१९ च्या बूस्टर डोसमुळे शरीरात अँटीबॉडी वाढण्यास मोठी मदत होते. त्यामुळे ओमिक्रॉनच्या संक्रमणाचा प्रसार होत नाही. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. त्यांच्यासाठी बोस्टर डोस हा एकमात्र उपाय आहे. यूकेतील आरोग्य विभागानं म्हटलंय की, कोविशिल्ड लसीचा एक बूस्टर डोस ओमिक्रॉन व्हेरियंटवर प्रभावी समजला जातो. कोविड -१९ च्या तिसऱ्या बूस्टर डोसमुळे ओमिक्रॉनच्या संसर्गापासून ७० ते ७५ टक्के संरक्षण होते. कोणत्याही लसीच्या डोसमुळे अँटीबॉडीची पातळी वेगाने वाढते. असं विषाणू शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

प्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी सांगितलं की, दोन डोस दिल्यानंतर एक बूस्टर दिल्यानंतर शरिरात अँटीबॉडी वाढण्यास मदत होते. त्यामुळे ओमिक्रॉन सारख्या लक्षणांपासून कोणताही धोका उद्भवत नाही. हा आजार रोखण्यासाठी दोन डोस किती प्रभावी असतात. ते आम्हाला माहिती नाहीये. असे जमील यांनी सांगितलं आहे.

भारतामध्ये सर्वाधिक लोकांना कोविशील्डची लस देण्यात आली आहे. यावर काय उपाय करावे लागतील. या प्रश्नावर भारतीय भारतीय SARS-Cov-2 Genomics Consortiaचे सल्लागार जमील यांनी सांगितले की, ज्या लोकांना कोविशिल्डचा एकच डोस मिळाला आहे. त्यांना दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांऐवजी ८ ते १२ या आठवड्यात देणं योग्य ठरेल.

Covaxin आणि Covishield या दोन भारतीय लसींमुळे व्हायरसला रोखण्यास मदत होते. Omicron व्हेरियंटवर प्रयोगशाळेत अभ्यास केला पाहिजे. कारण कोणती लस वापरायची आणि कधी लावायची हे ठरवलं पाहीजे. तसेच लहान मुलांना लसीकरण देण्यास सुरूवात केली पाहीजे. असं डॉ. जमील म्हणाले.

दरम्यान, डॉ. टी. जॅकब जॉन यांनी सांगितलं की, फायझर लसीमुळे बूस्टर डोस अँटीबॉडीज ४० टक्क्यांपर्यंत वाढवते. जर आपल्या ओमिक्रॉन या व्हेरियंटपासून दूर रहायचं आहे. तर नागरिकांना बूस्टर डोज देणं हेच योग्य ठरणार आहे.


हेही वाचा : Congress Rally in Jaipur: मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही, हिंदुत्ववादी सत्तेसाठी भुकेले, राहुल गांधींचा घणाघात