घरदेश-विदेशमृत्यूंनतरही जवानाने जपली माणूसकी

मृत्यूंनतरही जवानाने जपली माणूसकी

Subscribe

मृत्यूनंतरही भारतीय लष्कराच्या जवानाने दुसऱ्या जवानाला जीवनदान देऊन मानवतेचा संदेश दिला आहे. जवानाचे अवयव दान करुन त्याच्या घरच्यांनी खऱ्या अर्थाने माणूसकी जपली आहे.

मृत्यूनंतर भारतीय लष्कराच्या जवानाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. २९ वर्षीय या जवानाचा ब्रेन डेथ होऊन मृत्यू झाला होता. आपल्या घरातील तरूण जवानाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या शोकाकुळ कुटुंबाने अवयव दान करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. कुटुंबाच्या या निर्णयामुळे लष्कारातील ३० वर्षीय जवानाला जीवनदान मिळाले आहे. जीवनदान मिळालेल्या जवानाचे नाव एन. के. राव असे आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून राव यांची प्रकृती खालावली आहे. राव यांच्या शरीराचे बरेच अवयव अकार्यक्षम झाले आहेत. त्यांना मदत मिळावी यासाठी देशभरातील दात्यांना आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर एक आठवड्यानंतर राव यांना सैनिकाचे हृदय मिळाले. हे हृदय सियाचीनच्या बेस्ट मेडिकल फॅसिलिटी येथून विमानाने मागवण्यात आले. त्यानंतर भारतीय लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल या रूग्णालयात राव यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

हेही वाचा – अवयव दान चळवळीचे फलित; शेतकरी दाम्पत्याने घातले जिवंतपणी श्राद्ध

- Advertisement -

तरीही राव यांची प्रकृती गंभीर

राव यांच्यावर सध्या शस्त्रक्रिया करण्यात आली असली तरीही त्यांची प्रकृती अजूनही स्थिर झाली नसल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली आहे. डाॅक्टरांनी सांगितल्यानुसार राव यांना प्री-एग्झिस्टींग अॅझोटेमिया आणि ल्युकोसायटेसिस या आजारांची लागण झाली आहे. त्यामुळे हृदय प्रत्यारोपणानंतरही राव यांची प्रकृतीत सुधारणा झालेली दिसत नाही. शिवाय तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, देशात दान करण्यात आलेले आणि प्रत्यारोपण करण्याजोगे अवयव लवकर निकामी होतात. त्यामुळे त्याचा फायदा रूग्णांना होत नाही. यामागील कारण असे की, आपल्या देशात हे अवयव टिकण्यासाठी आणि रूग्णांना फायदा व्हावा, यासाठी लागणारी योग्य आणि पुरेशी सुविधा आपल्या देशात नाही. त्यामुळे प्रत्यारोपण होऊनही बर्‍याचदा रूग्ण दगावतात.

हेही वाचा – गुरुग्राम गोळीबार प्रकरण; न्यायाधिशाच्या मुलाच्या मृत्यूनंतर अवयवदानाचा निर्णय

- Advertisement -

हृदय प्रत्यारोपणसाठी ‘या’ समस्या उद्भवतात

भारतामध्ये अवयवदाना संबंधात नको ते गैरसमज आहेत. अवयव दानाचा संबंध धार्मिक क्रियाक्रमशी जोडल्या गेल्यामुळे लोक अवयव दान करताना भरपूर विचार करतात. जे लोक पुरोगामी विचारांचे स्वागत करतात ते अवयव दानाच्या संकल्पनेचे स्वागत करून अवयव दान करतात.


हेही वाचा – अवयवदानाची प्रक्रिया होणार सोपी; झेडटीसीसीचं अॅप प्रायोगिक तत्वावर सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -