घरदेश-विदेशगुरुग्राम गोळीबार प्रकरण; न्यायाधिशाच्या मुलाच्या मृत्यूनंतर अवयवदानाचा निर्णय

गुरुग्राम गोळीबार प्रकरण; न्यायाधिशाच्या मुलाच्या मृत्यूनंतर अवयवदानाचा निर्णय

Subscribe

गुरुग्राम गोळीबार प्रकरण. गंभीररित्या जखमी झालेल्या न्यायाधिशाच्या मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आहे.

गुरुग्राममध्ये न्यायाधिशा कृष्णकांत यांच्या पत्नी आणि मुलावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकानेच गोळीबार केला होता. यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या न्यायाधिशाच्या मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. १३ ऑक्टोबरला भर दिवसा गजबजलेल्या मार्केटमध्ये ही घटना घडली होती. न्यायाधीश कृष्णकांत यांच्या पत्नी रितू यांचा घटनेच्याच दिवशी मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या ध्रुववर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला. ध्रुवच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. ध्रुवच्या अवयवदानामुळे तीन जणांना जीवनदान मिळाले आहे. ध्रुवचे हृदय, यकृत आणि किडनी दान करण्यात आली आहे.

- Advertisement -

अशी घडली होती घटना

न्यायाधिश कृष्णकांत यांच्या पत्नी आणि मुलावर १३ ऑक्टोबरला गोळीबार करण्यात आला होता. कृष्णकांत यांच्या घरी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबल महिपाल याने हा गोळीबार केला होता. शनिवारी दुपारी गुरुग्रामच्या सेक्टर – ४९ मधील आर्केडिया मार्केटमध्ये कृष्णकांत यांची पत्नी आणि मुलगा शॉपिंगसाठी गेले होते. त्यांच्यासोबत महिपाल देखील होता. या मार्केटमध्ये खेरदीसाठी मोठी गर्दी असते. अशा गजबलेल्या ठिकाणीच महिपाल याने रितू आणि ध्रुववर गोळीबार केला आणि आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी अवघ्या काही तासात त्याला अटक केली. या गोळीबारात जखमी झालेल्या रितू यांचा त्याचदिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या ध्रुवचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. ध्रुवच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. ध्रुवचे हृदय, यकृत आणि किडनी दान करण्यात आली आहे.

- Advertisement -

या कारणामुळे केला गोळीबार

आरोपी महिपाल गेल्या दोन वर्षापासून न्यायाधीश कृष्णकांत यांच्या घरी सुरक्षारक्षक म्हणून तैनात होता. त्याला अटक करुन त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या घटनेनंतर गोळीबाराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आरोपी महिपाल न्यायाधिशाची पत्नी आणि मुलाच्या वागणुकीला कंटाळला होता. १३ नोव्हेंबरला रितू आणि ध्रुव शॉपिंगकरुन परतल्यानंतर महिपाल गाडीजवळ नव्हता तो आल्यानंतर त्यांनी त्याला खूप ओरडा दिला होता. त्या रागातूनच महिपाल याने रितू आणि ध्रुववर गोळीबार केला असल्याचे त्यांनी चौकशी दरम्यान कबूल केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -