घरमहाराष्ट्रबोनस न दिल्याने काँग्रेस, भाजपचा 'बेस्ट' मधून सभात्याग

बोनस न दिल्याने काँग्रेस, भाजपचा ‘बेस्ट’ मधून सभात्याग

Subscribe

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस अजून कर्मचाऱ्यांना मिळाल्यानसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा स्वर आहे. यामुळे राजकीय पक्षांनी सभात्याग केला.

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनसचे मिळण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दिवाळी संपली तरी अद्याप बोनस देण्यात आला नसल्याने आज झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीतून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने सभात्याग केली. बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती खराब असली तरी दिवाळी सणानिमित्त कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा, अशी मागणी केली जात होती. बोनस देण्याचे आश्वासन महाव्यस्थापकांकडून देण्यात आले. मात्र, दिवाळी सपल्यानंतरही अद्याप बोनस दिला नसल्याने विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी बोनस कधी देणार याची तारीख जाहीर करावी, अशी मागणी समिती बैठकीत केली. बोनस न मिळाल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरु उमटले होते.

बोनसची तारीख जाहीर केली नाही

यावर महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्टकडे पैसेच नाहीत मग बोनस कसा देणार, असे सांगितले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही महाव्यस्थापकांनी ८ दिवस घेऊन बोनस देण्याची नेमकी तारीख जाहीर करावी, अशी मागणी केली. त्यानंतरही महाव्यस्थापक कोणतीही तारीख जाहीर करत नसल्याने काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. बेस्टच्या ४४ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस दिला जाणार होता. मात्र बोनस देण्यासाठी बेस्टला २१.५८ कोटी रूपयांची गरज होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -