घरदेश-विदेशVideo : भारत जोडो यात्रेत काँग्रेसमधील दोन गट एकमेकांना भिडले, भररस्त्यातच धुमश्चक्री

Video : भारत जोडो यात्रेत काँग्रेसमधील दोन गट एकमेकांना भिडले, भररस्त्यातच धुमश्चक्री

Subscribe

Bharat Jodo Yatra | अराजक परसरवणाऱ्या दोघांना घटनास्थळावरून पोलिसांनी अटक केली आहे. इतर काही लोकांचा शोध घेतला जात आहे. व्हिडीओ फुटेजच्या आधारे इतरांचा शोध घेतला जात आहे.

लखनौ – उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात पोहोचलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेत दोन गटांत तुफान राडा झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. पक्षातील पीसीसी सदस्य आणि माजी प्रधान या दोन गटात हा राडा झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे स्थानिकांचं नुकसान झाल्याचंही समोर येतंय.


भारत जोडो यात्रेत प्रदेश प्रभारी अजय राय हे प्रमुख पाहुणे होते. यांच्यासोबत चालण्यावरून दोन गटात हमरीतुमरी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तर, दगडगोटेही मारले. यामुळे काही काळ तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पादचारी आणि रस्त्यावरील दुकानानांही याचा फटका बसला आहे.

- Advertisement -

अराजक परसरवणाऱ्या दोघांना घटनास्थळावरून पोलिसांनी अटक केली आहे. इतर काही लोकांचा शोध घेतला जात आहे. व्हिडीओ फुटेजच्या आधारे इतरांचा शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात 10 जानेवारीला सुनावणी

कौशांबी जिल्ह्यातील भरवारी नगरपालिकेच्या रोही बायपासपासून भरवारी येथून भारत जोडो यात्रा निघाली होती. या यात्रेचं नेतृत्त्व प्रदेश प्रभारी अजय राय करत होते. यादरम्यान, काँग्रेसचे पीसीसी सदस्य आणि प्रयागराजमधील हटवा येथील माजी सरपंचांचे समर्थक अजय राय यांच्यासोबत चालण्यावरून दोन गटांत वाद झाला.


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात काढण्यात येणारी भारत जोडो यात्रा सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळत आहे. अलिकडेच राजस्थानमधल्या कोटामध्ये एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला होताय त्यावेळी आजूबाजूच्या लोकांच्या प्रसंगावधानामुळे या तरुणाचा जीव वाचला. युवक काँग्रेसच्या धोरणाबद्दल या तरुणाच्या मनामध्ये नाराजी होती. म्हणून त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समजते. दरम्यान, संबंधित युवक भाजपाचा समर्थक असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

हेही वाचा भारत जोडो यात्रेत भाजपासमर्थक तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -