Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE कोरोनाने ४ लाख मृत्यू होणारा ब्राझील जगातला दुसरा देश, महिन्याभरातच १ लाख...

कोरोनाने ४ लाख मृत्यू होणारा ब्राझील जगातला दुसरा देश, महिन्याभरातच १ लाख लोकांनी गमावला जीव

भारत आणि अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये विदारक परिस्थिती

Related Story

- Advertisement -

देशातच नाही संपूर्ण जगभरात कोरोना थैमान घालत आहे. भारतात कोरोनाची लाट आली आहे. मात्र इतर देशात लाटेमागून लाट येतच असून तिथली परिस्थिती अत्यंत गंभीर होत आहे. जगात अमेरिका, भारत आणि ब्राझील या तीन देशांना कोरोनाच सर्वाधिक फटका बसला. भारत आणि अमेरिकेपेक्षा ब्राझील कोरोनामुळे पुरता भरडला गेला आहे. ब्राझीलमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतापेक्षा गंभीर असल्याचे दिसून येत आहेत. कारण ब्राझीलमध्ये केवळ एका महिन्यात एक लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ब्राझीलमध्ये केवळ मृतांचा आकडा ४ लाखांहून अधिक नोंदवण्यात आला आहे.  स्मशानभूमीत मृतदेहांचा खच पडला आहे. भारत आणि अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये विदारक परिस्थिती असल्याचे समोर आले आहे.

ब्राझीलमध्ये दर दिवशी २ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुले बळी जात आहे. गुरुवारी ब्राझीलमध्ये ३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. त्यातुलनेत भारताची मृत्यूसंख्या फार कमी आहे. मात्र असे सांगितले जात आहे, की गेल्या काही दिवसात ब्राझीलमध्ये रुग्णांच्या व मृत्यूच्या संख्येत घट झाली होती मात्र पुन्हा चक्र सुरु झाले. मृत्यूच्या संख्येत ब्राझील जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमधील ही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

ब्राझीलमध्ये आतापर्यंत ६ टक्क्याहूनही कमी लसीकरण झाले आहे. ब्राझीलच्या राष्ट्रपतींने आपण सर्वात शेवटी लस घेत असल्याचे सांगितले आहे.  कोरोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी ब्राझीलमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ब्राझीलच्या या भयानक परिस्थितीमुळे तिथल्या नागरिकांमझ्ये दहशतीचे वातावरण आहे. नागरिक प्रचंड मानसिक ताणात आहेत.


हेही वाचा – Covid-19 लसीचा फॉर्म्युला रेसिपीसारखा वाटता येत नाही, बिल गेट्स यांचे धक्कादायक वक्तव्य

- Advertisement -