घरताज्या घडामोडीVideo: सगळंच संपलय! माझे वडील हिरो होते, ब्रिगेडियर LS Lidder यांच्या मुलीची...

Video: सगळंच संपलय! माझे वडील हिरो होते, ब्रिगेडियर LS Lidder यांच्या मुलीची प्रतिक्रिया

Subscribe

बिग्रेडियर लखविंदर सिंह लिद्दर (Brigadier Lakhwinder Singh Lidder) यांची पत्नी गीतिका लिद्दर (Geetika Lidder) आणि मुलगी आशना लिद्दर (Aashna Lidder) या मायलेकींनी लिद्दर यांना दिल्लीतील बरार स्मशानभूमीत अखेरचा निरोप दिला. या दुःखत क्षणादरम्यानचे गीतिक लिद्दर आणि आशना यांचे फोटो डोळ्यात पाणी आणणारे आहेत. एकाबाजूला ब्रिगेडियर यांच्या पत्नीचा तिरंगा उवाराशी लावलेला फोटो होत असून दुसरीकडे मुलगी आशनाचा वडिलांवर अंत्यसंस्कार करतानाचा फोटो पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

तामिळनाडूच्या कुन्नूरमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये बिग्रेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वेळापूर्वी आशनाने वडिलांना मुखाग्नी दिला. त्यानंतर एएनआय या वृत्तासंस्थेशी बातचित करताना आशना म्हणाली की, ‘सर्व काही आठवतेय. १७ वर्ष ते माझ्यासोबत होते. १७ वर्षांच्या ज्या काही आठवणी आहेत, ज्या घेऊन पुढे जात आहोत. माझे वडील हिरो होते, माझे चांगले मित्र होते. हे राष्ट्राचे नुकसान आहे. आता लोकं आहेत, त्यामुळे दुःख जाणवत नाही. परंतु जेव्हा लोकं नसतील तेव्हा एवढे दुःख जाणवणार नाही. कारण ते खूप नशीबवान व्यक्ती होते. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेरणा देणारे होते. कदाचित नशीबात हेच होते, पण पुढे आमच्यासोबत चांगल्या गोष्टी होतील.’

- Advertisement -

तसेच लिद्दर यांची पत्नी गीतिका लिद्दर म्हणाल्या की, ‘आपल्याला चांगला निरोप द्यायला पाहिजे, आनंदात निरोप दिला पाहिजे. मी एक सैनिकाची पत्नी आहे. हा क्षण गर्वापेक्षा दुःखाचा जास्त आहे. खूप मोठे नुकसान झाले आहे.’


हेही वाचा – Gen Bipin Rawat: शेवटच्या क्षणी रावत यांनी पाणी प्यायला मागितले पण…: घटनेमुळे प्रत्यक्षदर्शनीची उडाली झोप


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -