घरताज्या घडामोडीहे बिनबुडाचे आरोप, या प्रकरणाचा पक्षाशी संबंध नाही, बृजभूषण सिंहांचं स्पष्टीकरण

हे बिनबुडाचे आरोप, या प्रकरणाचा पक्षाशी संबंध नाही, बृजभूषण सिंहांचं स्पष्टीकरण

Subscribe

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगटने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याकडे पुरावे असून आपण पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे विनेशने सांगितले आहे. दरम्यान, हे सर्व बिनबुडाचे आरोप केले जात असून या प्रकरणाचा पक्षाशी काहीच संबंध नाही, असं स्पष्टीकरण बृजभूषण सिंह यांनी दिलं आहे.

बृजभूषण सिंह यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले की, या प्रकरणी भाजपाने माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण मागितलेलं नाहीये. त्याचबरोबर पक्षातील कोणत्याही व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधलेला नाही. माझ्यावर जे आरोप करण्यात आलेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणात पक्षाची कोणतीही भूमिका असेल, असं मला वाटत नाही, असं बृजभूषण सिंह म्हणाले.

- Advertisement -

या सर्व प्रकरणात भारतीय जनता पक्षाची काहीही भूमिका नसेल, कारण हे आरोप एका व्यक्तीवर झाले आहेत, असंही सिंह म्हणाले. त्यामुळे या प्रकरणात सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारताच्या नामांकित कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप लावले आहे. त्याचबरोबर त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. या सर्व प्रकरणात केंद्र सरकारने आता लक्ष घातले आहे. केंद्र सरकारने खेळाडूंबरोबर या विषयावर चर्चा केली आहे. मात्र, या चर्चेतून कोणत्याही प्रकारचा मार्ग किंवा निष्कर्ष अद्यापही निघालेला नाही. त्यामुळे विनेशने पोलिसांकडे जाणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मी चौकशीसाठी तयार, लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांवर बृजभूषण सिंहांची प्रतिक्रिया


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -