Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Afghanistan: अफगाणिस्तानातील 'तालिबान राज' ब्रिटनला अमान्य

Afghanistan: अफगाणिस्तानातील ‘तालिबान राज’ ब्रिटनला अमान्य

Related Story

- Advertisement -

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब (Foreign Secretary Dominic Raab) यांनी तालिबान्यांना (Taliban) महत्त्वाचा संदेश दिला आहे. डॉमिनिक राब म्हणाले की, ‘ब्रिटन तालिबानला काबूलमधील नव्या सरकारला मान्यता देणार नाही. अफगाणिस्तानमधील नव्या वास्तवाशी जुळवून घ्यावे लागेल. कारण अफगाणिस्तानला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या तुटलेले पाहायचे नाही आहे.’ अशा शब्दांमध्ये राब यांनी मत व्यक्त केले आहे.

- Advertisement -

यापूर्वी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव म्हणाले होते की, ‘अफगाणिस्तानमध्ये तालिबानसोबत एकत्र येणे गरजेचे आहे. परंतु युनायटेड किंगड्म सरकारला मान्यता देण्यासाठी कोणतेही योजना नाही आहे.’ राब म्हणाले की, ‘ब्रिटन भविष्यात कोणत्याही परिस्थिती तालिबानला मान्यता देणार नाही.’

परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी दोहामध्ये कतारच्या अमीर आणि परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. अफगाणिस्तानची परिस्थिती आणि युद्धग्रस्त देशातून ब्रिटिन नागरिक आणि अफगाणिस्तान समर्थकांना बाहेर काढण्यावर चर्चा केली. परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालयाने (एफसीडीओ) ही माहिती दिली.

- Advertisement -

दरम्यान अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेताच तालिबान्यांनी सत्ता स्थापनेला सुरुवात केली आहे. परंतु अफगाणिस्तानातून सैन्य माघार घेण्याच्या जो बायडेन यांच्या निर्णयाचा अमेरिकन जनतेकडून विरोध केला जात आहे. एनपीआर आणि पीबीएस न्यूशोअरसह एका नव्या मॅरिस्ट नॅशनल पोलनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांची अप्रुव्हल रेटिंग ४३ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष झाल्य़ानंतरची बायडन यांची आत्तापर्यंतची सर्वात मोठी निच्चांकी रेटिंग आहे.  याशिवाय अमेरिकनं जनतेने अफगाणिस्तानात संयुक्त राज्यांची भूमिका निष्फाळ ठरल्याचे मत नोंदवले आहे.


हेही वाचा – Afghanistan: अफगाणिस्तानमधील २०० लाख कोटींच्या नैसर्गिक खनिजांवर चीनचा डोळा


 

- Advertisement -