घरदेश-विदेशगर्लफ्रेंडसाठी बसपा नेत्याने लीक केला MBA चा पेपर

गर्लफ्रेंडसाठी बसपा नेत्याने लीक केला MBA चा पेपर

Subscribe

उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारी बहुजन समाज पक्षाच्या एका नेत्याला अटक केली. आता ही अटक काही सामाजिक किंवा राजकीय आंदोलनासाठी नव्हती. तर या बहाद्दर नेत्याने आपल्या गर्लफ्रेंडसाठी थेट एमबीएचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केला. अलीगढ मुस्लिम युनिवर्सिटीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याने पेपर फोडला. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर बसपा नेता अजूनही फरार आहे.

पेपर फोडलेल्या नेत्याचे नाव फिरोज आलम उर्फ राजा असे त्या नेत्याचे नाव आहे. राजाने आपला गुन्हा मान्य केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजाची गर्लफ्रेंड एमबीए कोर्स करत आहे. राजाने अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील कर्मचारी इर्शादच्या मदतीने पेपर फोडण्याचा प्रयत्न केला. इर्शादला विद्यापीठात कायम नोकरी देण्याचे आश्वासन देऊन राजाने त्याच्याकडून हे कृत्य करवून घेतले होते.

- Advertisement -

फिरोज आलम उर्फ राजाने पोलिसांना सांगितले की, माझ्या गर्लफ्रेंडला वचन दिले होते की तो तिला परिक्षेची प्रश्नपत्रिका आणून देईल. त्यानंतर त्याने तिला एक बनावट प्रश्न पत्रिका उत्तरासहित दिली दहोती. मात्र ती प्रश्नपत्रिका खोटी असल्याचे कळताच गर्लफ्रेंडने राजासोबत भांडण केले होते. तसेच त्याच्याबरोबर बोलणंही तिने सोडले होते.

गर्लफ्रेंड आक्रमक झाल्यामुळे राजाने वेगळा मार्ग काढला. राजाचा मित्र हैदरला सोबत घेऊन त्यांनी इर्शादला गाठले. त्याला नोकरीमध्ये कायम करण्याचे आमिष दाखवून पेपर फोडण्यासाठी तयार केले. मात्र त्याआधीच त्यांचे बिंग फुटले आहे. पोलिसांनी हैदर आणि इर्शादला अटक केली आहे. तर राजा अजूनही फरार आहे. एसएसपी आकाश यांनी सांगितले की, हे तिघे ज्या घरात बसून नियोजन करत होते, त्या घराला सिल केले आहे. पेपर लीक केल्यानंतर तो दोन हजार रुपयांमध्ये विकण्याचा इरादा या तिघांनी केला होता. यासाठी त्यांनी एक व्हॉट्सअॅप ग्रुपही बनवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -