घरअर्थसंकल्प २०२२Budget 2022: अर्थसंकल्पातून काय मिळाले? काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या

Budget 2022: अर्थसंकल्पातून काय मिळाले? काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत अर्थसंकल्प २०२२ (Budget 2022) सादर केला. या अर्थसंकल्पात तरुणांना ६० लाख नोकऱ्या देण्याचा दावा केला गेला. तसेच एका वर्षात गरीबांसाठी संपूर्ण देशात ८० लाख परवडणारी घरे बांधली जातील असे सांगण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे सर्व गोष्टींवरील कस्टम ड्युटी आणि आयात शुल्कासह सर्व शुल्क वाढवण्याबद्दल आणि कमी करण्याबाबत निर्मला सीतारामन यांनी घोषणा केल्या. त्यामुळे कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि कोणत्या गोष्टी महागणार जाणून घ्या. (What gets cheaper, what’s costlier)

काय स्वस्त होणार?

चामडे, कपडे, कृषीसंबंधित वस्तू, पॅकेजिंग बॉक्स, पॉलिश हिरे, मोबाईल फोन चार्जर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्वस्त होणार आहेत. तसेच रत्न आणि दागिन्यांवरील आणि पॉलिश हिऱ्यांवरील कस्टम ड्यूटी घटवून ५ टक्के कर करण्यात आला आहे.

- Advertisement -

काय महागणार?

भांडवली वस्तूंवर ७.५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आयात वस्तू महागणार आहेत. तसेच इमिटेशन ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे, जेणेकरून याची आयात कमी करता येईल. परदेशी छत्र्या महागणार आहेत. याशिवाय यंदा ऑक्टोबरपासून मिश्रित नसलेल्या इंधनावार २ रुपये प्रति लीटर दराने एक्साइज ड्युटी लावली जाईल.

गेल्या वर्षी अर्थसंकल्पात स्वस्त आणि महाग काय झाले?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्यक्ष करदात्यांना केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ मध्ये कोणताहा दिलासा दिला नव्हता. सरकारने दारू, चणे, वाटाणे, मसून यासह अनेक उत्पादनांवर कृषी पायाभूत सुविधा उपकर लागू करण्याची घोषणा केली होती. निर्मला सीतारामन यांनी कस्टममध्ये ४००हून जास्त सवलतींचे पुनरावलोकन करण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच अनेक प्रकारच्या कच्च्या मालावर कस्टम ड्युटी वाढवली आणि काही स्टील उत्पादनांवरील शुल्क हटवण्यात आले. याशिवाय तांब्याच्या भंगारावरील शुल्क ५ टक्क्यांवरून २.५ टक्क्यांपर्यंत कमी केले. मोबाईलच्या काही पार्ट्सवर २.५ टक्के शुल्क लावण्यात आले. कापूस, रेशीम, प्लास्टिक, चामडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहनांचे भाग, सौर उत्पादने, मोबाईल, चार्जर, आयात केलेले कपडे, रत्न, एलईडी बल्ब, फ्रीज/एसी आणि मद्य बजेटमध्ये महागले आहेत. दुसऱ्याबाजूला नायलॉनचे कपडे, लोखंड, स्टील, तांब्याच्या वस्तू, सोने, चांदी आणि प्लॅटिनम या वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Budget 2022: लवकरच 5G सेवा सुरू होणार, गावागावात ब्रॉडबँड सेवा उभारण्यात येणार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -