घरदेश-विदेशसांडणीच्या दुधामुळे मालक 'मालामाल'

सांडणीच्या दुधामुळे मालक ‘मालामाल’

Subscribe

राजस्थानातील सांडणीच्या दुधाची किंमत तब्बल ३ हजार रुपये प्रतिलिटर इतकी आहे. त्यामुळे अमेरिकेतील लोकांना एक लिटर दुधाच्या पावडरसाठी किमान ५० डॉलर्स मोजावे लागतात. यामुळे राजस्थानमधील सांडणीचे मालक आनंदी आणि समाधानी आहेत.

दूध प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे आपण जाणतोच. त्यामुळे सहसा आपण गायीचं किंवा म्हशीचं दूध पिणं पसंत करतो आणि आपल्याकडे ते सहज उपलब्धही होतं. मात्र, राजस्थानमध्ये सांडणीच्या दुधाला खूप मागणी आहे. सांडणीच्या दुधात अनेक औषधी गुणधर्म असून खास मधुमेहावर हे दूध अत्यंत गुणकारी असतं. औषधी गुणधर्म असलेल्या या दुधाची मागणी खूप जास्त असल्यामुळे साहाजिकच त्याची किंमतही जास्त आहे. राजस्थानमध्ये मिळणाऱ्या या ‘कॅमल मिल्क’ला परदेशात खूप मोठी मागणी आहे. विशेषत: अमेरिकेमध्ये या कॅमल मिल्कची मागणी अधिक आहे. उंटीणीच्या दुधापासून तयार करण्यात येणारी मिल्क पावडर अमेरिकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. त्यामुळे हा व्यवहार राजस्थानमधील लोकांसाठी चांगलाच फायदेशीर ठरतो आहे.

एक लिटर दूध ‘३’ हजार रुपयांना

दिवसेंदिवस ‘कॅमल मिल्क’ला वाढत असलेल्या मागणीमुळे सांडणी पाळणाऱ्या लोकांचा नफाही वाढत आहे. सांडणीच्या या दुधाची किंमत तब्बल ३ हजार रुपये प्रतिलिटर इतकी आहे. त्यामुळे अमेरिकेतील लोकांना एक लिटर दुधाच्या पावडरसाठी किमान ५० डॉलर्स मोजावे लागतात. यामुळे राजस्थानमधील सांडणीचे मालक आनंदी आणि समाधानी आहेत. सांडणीचे मालक आपल्या दुधाची विक्री कच्छ, सुरत आणि बिकानेरमधल्या उत्पादक कंपन्यांमध्ये करतात. साधारण २०० मिलिलीटरच्या पॅकेटमधून या दुधाची विक्री केली जाते. तर कॅमल मिल्कची पावडर साधारण २०० ते ५०० ग्रॅम वजनाच्या पाकीटातून विकली जाते. ऑनलाईन माध्यमातूनही या कॅमल मिल्कची विक्री केली जाते. त्यामुळे परदेशातील टेक्नोसॅव्ही लोकांना ऑनलाईन मिल्क पावडर विकत घेणं नक्कीच फायदेशीर ठरत असणार.

- Advertisement -

असे असते ‘कॅमल मिल्क’

नॅशनल रीसर्च सेंटर ऑन कॅमल (बिकानेर ) या संस्थेचे संचालक- डॉ.एन.व्ही.पाटील यांनी सांगितल्यानुसार, ‘सांडणीच्या दुधात औषधी गुणधर्म असतात. सांडणीचे दूध मधुमेह आणि संधिवात या आजारांवर हे दूध विशेष गुणकारी असते. कॅमल मिल्कमध्ये प्रथिनं, जीवनसत्वं आणि अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात. गाय किंवा म्हशीच्या दुधापेक्षा कॅमलच्या दुधाची चव आणि त्याचा रंग थोडासा वेगळा असतो.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -