घरदेश-विदेशरामनगरी अयोध्या लवकरच बनणार वर्ल्ड क्लास सिटी!

रामनगरी अयोध्या लवकरच बनणार वर्ल्ड क्लास सिटी!

Subscribe

रामनगरी अयोध्येचा कायापालट करून नवरूप देण्याची तयारी सुरू

रामनगरी अयोध्येचा कायापालट करून नवरूप देण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी कॅनडाच्या एलईए असोसिएट्सची सल्लागार एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मिळतेय. ही कंपनी अयोध्या नगरीचा संपूर्ण विकास करणार असून शहर नियोजन, पर्यटन यासारख्या दृष्टीने संपूर्ण नियोजन करणार आहे. यामध्ये सीपी कुकरेजा आणि L &T या कंपन्या भागीदार असणार आहेत. यासह ७ कंपन्यांनी सल्लागार कंपनी होण्यासाठी बोली देखील लावली होती. दरम्यान उत्तर प्रदेश सरकार अयोध्याला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याच्या तयारीत आहे. राम मंदिराच्या भव्यतेसाठी तीन कंपन्यांशी करार देखील करण्यात आला आहे. हा करार अयोध्येला स्मार्ट सिटी एरिया प्लॅनिंग, रिव्हर एरिया डेव्हलपमेंट, हेरिटेज, टुरिझम आणि शहरी पायाभूत सुविधा नियोजनासाठी करण्यात आला आहे.

अयोध्या विकास प्राधिकरणाने कॅनडाची कंपनी एलईए असोसिएट्स साउथ अशिया प्रायव्हेट लिमिटेडची निवड केली. गुणवत्ता आणि खर्च यावर आधारित भारत आणि परदेशातील अन्य दोन कंपन्यांचा पराभव करून एलईएची निवड करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या विकास प्राधिकरणाने २६ डिसेंबर रोजी प्रस्तावासाठी रिक्वेस्ट फ़ॉर प्रपोजल सादर केले होते. प्रस्तावाच्या विनंतीनुसार, अनेक कंपन्यांनी अर्ज केले होते. अयोध्या विकास प्राधिकरणाने एकूण सात ऑफरपैकी सहा निविदांची स्पर्धेसाठी निवड केली आहे.

- Advertisement -

लखनौ स्थित असणाऱ्या गृहनिर्माण विकास परिषदेत या तिन्ही कंपन्यांच्या आर्थिक व तांत्रिक निविदेच्या आधारे एलईएला अयोध्या दृष्टीचे भव्य कागदपत्र बनविण्याचे काम देण्यात आले आहे. एलईए, मेसर्स लार्सन अँड टुब्रो इन्फ्रास्ट्रक्चर, इंजिनीअरिंग लिमिटेड आणि मेसर्स सीपी कुकरेजा असोसिएट्सचे भागीदार म्हणून संघटनात्मक संस्था देखील असणार आहेत. निवड करण्यात आलेली कंपनी एका सर्वेक्षणाद्वारे अयोध्या शहराच्या संपूर्ण विकासावर काम करणार आहे. अयोध्याची धार्मिक पर्यटन क्षमता आणि राम मंदिराचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वांगीण विकासाचे कार्य हाती घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. कंपनी एकत्रित पायाभूत सुविधा योजना आणि धोरण तयार करण्याच्या कामांवर देखील लक्ष केंद्रित करणार आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -