घरताज्या घडामोडीमुंबई-वर्सोवात सिलेंडरच्या गोदामाला आग; ४ जण जखमी

मुंबई-वर्सोवात सिलेंडरच्या गोदामाला आग; ४ जण जखमी

Subscribe

मुंबई-वर्सोवा येथे सिलेंडरच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी तळोजा एमआयडीसीत असलेल्या एका रासायनिक कारखान्याला आग लागल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा मुंबई-वर्सोवा येथील यारी कंपाऊंडमधील सिलेंडरच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १४ ते १६ गाड्या दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सिलेंडर गोदामाला आग लागल्यामुळे परिसरात स्फोटांचे मोठे आवाज होत आ आहे. मात्र, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार लागलेली आग ही लेव्हल २ ची असून यामध्ये आतापर्यंत चार जण जखमी झाले यामधील १ जण गंभीर जखमी आहेत.

- Advertisement -

आगीत चार जण जखमी

मुंबई-वर्सोवा याठिकाणी सकाळी १०.३०च्या सुमारास सिलेंडरच्या गोदामाला अचानक आग लागली. या आगीमुळे मुंबई-वर्सोवा परिसर हादरुन गेला आहे. एकापाठोपाठ एक सिलेंडरचे स्फोट झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच दाटीवाटीचा हा परिसर असल्यामुळे स्थानिकांच्या मनातील भिती वाढली आहे. या घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहे. जखमींना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


हेही वाचा – देवभूमीतील हाहाकार नैसर्गिक आपत्ती नव्हती – सामनाचा केंद्रावर निशाणा

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -