घरताज्या घडामोडीब्राह्मण-बनिया परत जा, आम्ही बदला घेऊ... जेएनयूमध्ये भिंतींवर लिहिला जातीयवादी मेसेज

ब्राह्मण-बनिया परत जा, आम्ही बदला घेऊ… जेएनयूमध्ये भिंतींवर लिहिला जातीयवादी मेसेज

Subscribe

जेएनयू पुन्हा एकदा चर्चेच्या अग्रस्थानी आले आहे. कारण जेएनयूच्या भिंतींवर ब्राह्मण आणि बनियाविरोधात घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. अन्यता रक्तपात होईल, आम्ही बदला घेऊ, अशा प्रकारच्या घोषणाही लिहिण्यात आल्या आहेत. ही घटना समोर आल्यानंतर जेएनयूमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या घरून सतत फोन येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणण आहे.

जेएनयूचे कुलगुरू प्रोफेसर शांतीश्री डी पंडित यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु जेएनयूच्या प्रशासनानेही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. कॅम्पसमधील अशा फुटीरतावादी कारवाया अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. जेएनयू सर्वांचे आहे. जेएनयू टीचर्स फोरमनेही याविरोधात संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

जेएनयूच्या कॅम्पसमध्ये विविध ठिकाणी भिंतींवर ब्राह्मणविरोधी घोषणा लिहिल्या. ब्राह्मण आणि बनिया परिसर सोडा, आम्ही तुमच्यासाठी येत आहोत, आम्ही बदला घेऊ, रक्तपात होणार, अशा काही घोषणा सर्व भिंती आणि दरवाजांवर लिहिण्यात आल्या आहेत. तसेच या संदर्भातील फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

जेएनयू टीचर्स फोरमने ट्विटरवर काही फोटोही शेअर केले आहेत. पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, डाव्या उदारमतवादी टोळ्या प्रत्येक मतभेदाच्या आवाजाला धमकावण्याचे काम करत असताना, त्यांनी परस्पर आदर, नागरी मूल्ये प्रस्थापित करणारा आणि सर्वांना समान वागणूक देणारा ईसी प्रतिनिधी निवडण्याचे आवाहनही केले आहे. हे गुंडगिरीचे अत्यंत निषेधार्ह कृत्य, असं त्यांनी लिहिलं आहे.


हेही वाचा :संजय राऊतांचे क्रिकेट मैदानात चौकार, षटकार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -